नवीन बिटको रुग्णालयात प्रा.जोगेंद्रजी कवाडे यांचा वाढदिवस गरीब रूग्णांना फळे वाटप करून साजरा करण्यात आला
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या व प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाच्या वतीने राष्ट्रीय नेते व नामांतर लढ्यातील, जागतिक स्तरावरच्या लॉन्गमार्चचे प्रणेते आदरणीय खासदार प्रा.जोगेंद्रजी कवाडे सर यांचा आज एक एप्रिल रोजी वाढदिवस असल्याने संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी सरांच्या वाढदिवसानिमित्ताने अनेक कार्यक्रम आयोजित केले असून नाशिकमध्येही पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ पार्टीच्या वतीने नाशिकरोड येथील नवीन बिटको हॉस्पिटलमध्ये गोरगरीब रूग्णांना फळ वाटप करून आदरणीय सरांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड.शशीभाई उन्हवणे तसेच जावेद शेख,रवी पगारे,शादाब शेख,मुरली कोळे,रफीक टकारी गोविंद शिंगारे,सलमान खान,बिलाल शेख,सुनीता कर्डक,मीना पगारे,गयाबाई काळे,पक्षाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी गोरगरिबांना फळ वाटप केले यावेळी हॉस्पिटल मधील डॉक्टर नर्स व संपूर्ण स्टाफ यावेळी ठिकाणी उपस्थित होता