सिन्नर फाटा येथील खुनाच्या दुसरा संशयित आरोपी योगेश रामदास पगारे जेरबंद…… नाशिक रोड पोलिस ठाण्याची उल्लेखनीय कारवाई……
नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीत सिन्नर फाटा येथे ०२ ऑगस्ट रोजी जमिनीच्या वादातून एकाचा खून करण्यात आला होता. खुनाची संपूर्ण घटना सी सी टीव्ही मध्ये कैद झाली होती.यश टायर्स समोर असतांना योगेश पगारे व सद्दाम मलिक यांनी त्यांच्याशी वाद करून सद्दाम मलिक याने टायर दुकानातील ब्रेक लॉकची लोखंडी सडई घेवुन प्रमोद वाघ यास जीवे ठार मारण्याचे उद्देशाने डोक्यात मारून गंभीर जखमी केले होते. फिर्यादी ऋतिक रमेश पगारे यांच्या या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
नाशिक रोड पोलीस स्टेशनेच गुन्हे शोध पथकाचे विष्णु गोसावी यांना गुन्हयातील पाहिजे आरोपी योगेश रामदास पगारे हा ईच्छामंनी गणपती मंदीर, उपनगर परिसरात येणार असल्याची बातमी मिळाली.
सहायक पोलिस निरीक्षक प्रविण सुर्यवंशी व गुन्हे शोध पथकाने ईच्छामंनी गणपती मंदीरच्या परिसरात संशयित योगेश रामदास पगारे वय ४२ वर्षे राह- चेहडी शिव, सिन्नर फाटा, नाशिक रोड,मोठ्या शिताफीने पकडून त्यास ताब्यात घेतले.
संशयिताने त्याचा साथीदार सद्दाम सलिम मलिक, रा-एक लहरा रोड, सिन्नर फाटा, नाशिक रोड यांचे मदतीने जुन्या वादाची कुरापत काढुन प्रमोद वाघ यास जिवेठार मारल्याची कबुली दिली. योगेश रामदास पगार हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असुन त्याचे विरूध्द नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. याअगोदर हल्ला करणारा सद्दाम सलीम मलिक याला सुध्दा पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे.
सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपायुक्त आयुक्त मोनिका
राउत, सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी., सहा. पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, पोलिस निरीक्षक बडेसाब नाईकवडे, सहायक पोलिस निरीक्षक प्रविण सुर्यवंशी, अनिल शिंदे, विष्णु गोसावी, विजय टेमगर, संदिप पवार, सागर आडणे, गोकुळ कासार, रोहित शिंदे, दत्तात्रय वाजे, योगेश रानडे, नाना पानसरे, कल्पेश जाधव, अजय देशमुख, भाउसाहेब नागरे, केतन कोकाटे, नासिर शेख, संतोष पिंगळ आदींनी केली आहे.