HomeUncategorizedशिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत तिहेरी हत्याकांड करणा-या दोन आरोपींना नाशिकरोड पोलीसांकडून अटक
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत तिहेरी हत्याकांड करणा-या दोन आरोपींना नाशिकरोड पोलीसांकडून अटक

शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत तिहेरी हत्याकांड करणा-या दोन आरोपींना नाशिकरोड पोलीसांकडून अटक……

शिर्डी पोलिस ठाणे हद्दित्त गुन्हा करून परराज्यात पळून जाणाऱ्या आरोपींना नाशिक रोड पोलिसांनी शिताफीने अटक करून अहमदनगर गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की २१ सप्टेंबर रोजी पहाटे ०३/०० वा. सुमारास नाशिक रोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश शेळके यांना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उप निरीक्षक तुषार धाकराव, यांनी शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत सावळीविहीर याठिकाणी जुन्या कौटूबिक वादाच्या कारणातून २० सप्टेंबर रोजी रात्री ११/०० वाजेच्या सुमारास जावयाने चुलतभावासह सासुरवाडीला जावून सासुरवाडीमध्ये असलेल्या पत्नी, मेव्हणा आजेसासू, सासू, सासरे, मेव्हणी यांच्यावर धारदार चाकूने वार करून हल्ला केला असून त्यात तीन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, तर इतर ०३ गंभीर जखमी आहेत. हत्याकांड करणारे आरोपी सुरेश निकम आणि त्याचा चुलत भाऊ रोशन निकम हे दोघे नाशिकच्या दिशेने पळून जात असल्याची माहिती असल्याचे कळविले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास वांजळे यांना सदर माहिती दिल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक शेळके, रात्रगस्त अधिकारी पोलिस उप निरीक्षक रामदास विंचू व गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांना आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या.

२१ सप्टेंबर रोजी पहाटे ०३ / १० वा. सहायक पोलिस निरीक्षक गणेश शेळके, पोलिस उप निरीक्षक रामदास विंचू व गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांनी तात्काळ नाशिक पुणे हायवेवर शिंदेगाव टोलनाका याठिकाणी जावून सापळा रचला. यादरम्यान नाशिक बाजूकडे येणा-या वाहनांची तपासणी करत असताना एक काळया रंगाची विनाक्रमांकाची पल्सर मोटारसायकल येताना दिसली त्यांना थांबण्याचा इशारा केला असता मोटार सायकल न थांबवता वेगात पळून जावू लागल्याने तेच आरोपी असल्याचा संशय बळावल्याने पोलीस पथकाने तात्काळ कारवाई करत दोन्ही संशयितांना पहाटे ०३ / ३२ वाजताच्या सुमारास पल्सर मोटारसायकलसह जागीच ताब्यात घेतले. सुरेश ऊर्फ बाळू विलास निकम, रोशन कैलास निकम असे दोन्ही संशयित आरोपींची नावे आहेत. दोघांकडे अधिक चौकशी केली असता आरोपी सुरेश निकम याचा ०९ वर्षापुर्वी सावळीविहीर येथील वर्षा सुरेश निकम हिच्याशी झालेला असून मागील काही दिवसांपासून दोन्ही कुटूंबामध्ये त्यावरून वारंवार वाद व कौटूबिंक कलह चालू आहेत. याच जुन्या कौटूंबिक वादामुळे आरोपी सुरेश निकम आणि रोशन निकम यांनी सावळीविहीर येथे जावून सासुरवाडीच्या लोकांवर चाकूसारख्या धारदार व तिक्ष्ण हत्याराने वार केल्याने मेव्हणा रोहित चांगदेव गायकवाड, पत्नी वर्षा सुरेश निकम, आजे सासु हिराबाई ध्रुपद गायकवाड वय ७० वर्षे यांचा मृत्यू झाला असून सासू संगिता चांगदेव गायकवाड, सासरे चांगदेव ध्रुपद गायकवाड, व मेव्हणी योगिता महेंद्र जाधव रा. सावळीविहीर ता. राहता हे गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांचेवर श्री साईबाबा संस्थान हॉस्पिटल, शिर्डी येथे उपचार चालू आहेत. गुन्हा घडल्यानंतर आरोपी नाशिकरोड रेल्वे स्टेशनमार्गे परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असतानाच त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
घडलेल्या घटनेबाबत शिर्डी पोलीस स्टेशन येथे भादंवि कलम ३०२, ३०७, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी सुरेश विलास निकम, रोशन कैलास निकम रा. संगमनेर खुर्द ता. संगमनेर जि. अहमदनगर यांना स्थानिक गुन्हे शाखा अहमदनर यांचे ताब्यात दिले आहे.

सदरची उल्लेखनिय कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत, मा. सहा. पोलीस आयुक्त नाशिकरोड विभाग, आनंद वाघ, नाशिकरोड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  देविदास वांजळे यांचे मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलीस स्टेशनचे सपोनि गणेश शेळके, पोउपनिरी रामदास विंचू,  सुभाष घेगडमल,  संदीप पवार,  गोकुळ कासार, कल्पेश जाधव,  भाउसाहेब चत्तर,  ताजकुमार लोणारे यांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments