Thursday, June 1, 2023
Homeताज्या बातम्यानो युवर आर्मी अभिनयानं अंतर्गत भव्य लष्करी तोफा व साहित्याचे प्रदर्शन.

नो युवर आर्मी अभिनयानं अंतर्गत भव्य लष्करी तोफा व साहित्याचे प्रदर्शन.

435 Views

नो युवर आर्मी अभिनयानं अंतर्गत भव्य लष्करी तोफा व साहित्याचे प्रदर्शन.

 

महाराष्ट्रातील पहिलेच भव्य लष्करी तोफा व साहित्याचे प्रदर्शन नाशिकच्या गोल्फ क्लब ईदगाह मैदानावर आयोजित करण्यात येणार आहे. नो युवर आर्मी प्रदर्शनाच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलाची ताकद नाशिककरांना अनुभवता येणार आहे. नाशिक येथील ईदगाह मैदानावर १८ व १९ मार्च रोजी महाराष्ट्रातील पहिलेच भव्य लष्करी तोफा व साहित्याचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. केंद्रिय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते १८ मार्च रोजी सकाळी ९:३० वाजता या ‘नो युवर आर्मी ‘ या प्रदर्शनाचे उदघाटन होणार असल्याची माहिती नाशिकरोड आर्टिलरी सेंटरचे कर्नल एस.के.पांडा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नागरिकांना आर्मीचे कार्य कसे चालते यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध तोफांसह अत्याधुनिक लष्करी उपकरण यानिमित्ताने नाशिककरांना अगदी जवळून पहायला मिळणार आहे. प्रदर्शनात विविध तोफा, शस्त्रागार, अभियंता उपकरणे, हवाई दल, आर्मी एव्हिएशन, वैद्यकिय उपकरणे प्रदर्शन, पायदळ, आर्मी रेकॉर्ड स्टॉल, रणगाडे, रायफल्स, रॉकेट लॉन्चरस, ई एल एम, लॉरेन्स, फिनाका, इंडियन फिल्ड गन, बोफोर्स, धनुष, १०५ एमएम गन अशा विविध प्रकारचे संरक्षण साहित्य जवळून बघण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे. १८ व १९ मार्च रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेदरम्यान हे प्रदर्शन नागरिकांना पाहण्यासाठी खुले राहणार आहे.

 

तरूणांना सैनिकांशी संवाद साधण्याची संधीही यानिमित्ताने मिळणार आहे. अग्नीवीर भरती मार्गदर्शनही या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती कर्नल एस.के.पांडा यांनी दिली प्रदर्शनाच्या यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.भारती पवार, खासदार हेमंत गोडसे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे, स्कुल ऑफ आर्टिलरी रेजिमेंटचे लेफ्टनंट जनरल एस.हरीमोहन अय्यर यांसह नाशिक मधील सर्व आमदार उपस्थित राहणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments