मागासवर्गीय समाजावर होणारे अन्याय अत्याचार तसेच विविध प्रश्नांवर पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने निवेदन…..
नाशिक येथे sc/st आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ आणि कमिटी नाशिक येथे आले असताना त्यांना नाशिकमध्ये आणि महाराष्ट्रात विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने मागासवर्गीय समाजावर होणारे अन्याय अत्याचार तसेच विविध प्रश्नांवर पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे यांनी तत्काळ महाराष्ट्र सरकारने कार्यवाही करावी अशी मागणी करून अडसूळ साहेबाना निवेदन देण्यात आले.
यावेळी आयोगाचे सदस्य लोखंडे उपस्थित होते तसेच पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष शशिभाई उन्हवणे, माजी न्यायाधीश अनिल वैद्य साहेब, वाल्मीक समाजाचे नेते नगरसेवक सुरेश दलोड,सुरेश मारू व अन्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते