सिन्नर फाटा प्रमोद वाघ खुनाचा मुख्य आरोपी १२ तासांच्या आत गुन्हे शाखा युनिट १ च्या ताब्यात….. युनिट १ ची उल्लेखनीय कामगिरी……
नाशिकरोड येथील खुनाचा गुन्हा अवघ्या बारा तासामध्ये उघडकीस आणुन मुख्य आरोपीस जेरबंद करून गुन्हेशाखा युनिट क. १ ने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.सिन्नर फाटा येथील शुक्रवारी जुन्या वादावरून झालेल्या प्रमोद वाघ यांच्या खुनाचा मुख्य आरोपी क्राईम युनिट १ ने ताब्यात घेतले आहे.
नासिक पूना महामार्गावर उजव्या बाजूला सर्व्हिस रोडवर सिन्नर फाटा भागात असेलल्या लक्ष्मी दर्शन टॉवर क्रमांक १ मध्ये असलेल्या यश टायर नावाचे व्हील अलाईटमेंट च्या दुकानाबाहेर जुन्या वादातून प्रमोद वाघ या व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. उपचारादरम्यान प्रमोद वाघ याचा मृत्यू झाला होता. खुनाच्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. मुख्य आरोपीला जो पर्यंत अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतले होते.
प्रमोद केरूजी वाघ (मयत) वय-४०वर्षे यास यश टायर्स समोर असतांना योगेश पगारे व सद्दाम मलिक यांनी त्यांच्याशी वाद करून सद्दाम मलिक याने टायर दुकानातील ब्रेक लॉकची लोखंडी रॉड घेवुन प्रमोद वाघ यास जीवे ठार मारण्याचे उद्देशाने डोक्यात मारून गंभीर जखमी केले होते. याबाबत ऋतिक रमेश पगारे, वय-२४वर्षे, रा-लाला का ढाबा शेजारी, किरणनगर, चेहडीशिव नाशिकरोड यांच्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर उपचार दरम्यान प्रमोद वाघ यांचा मृत्यू झाल्यानंतर नाशिकरोड पोलिस ठाण्यात कलम कलम १०३ (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हयातील मुख्य आरोपी सद्दाम मलिक याचा शोध घेत असताना विशाल काठे यांना सद्दाम मलिक हा वडाळागाव भागातच येणार असल्याची बातमी मिळाली.
तात्काळ वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलिस उप निरीक्षक रविंद्र बागुल, प्रविण वाघमारे, विशाल काठे, प्रशांत मरकड, प्रदिप म्हसदे, संदिप भांड, नाझीमखान पठाण, विशाल देवरे, समाधान पवार यांच्या पथक वडाळागाव परिसरात आरोपींचा रात्रभर भर पावसात शोध होते. आरोपी हा वेश बदलुन नाशिकरोड, इंदिरानगर, वडाळागाव, मुंबईनाका, नानावली, मुंबईनाका आदी परिसरात फिरत होता परंतु शेवटी वडाळागावातील राजवाडा परिसरात पथकाने सद्दाम मलिक रा-मंदिकीनी चाळ, अरींगळेमळा मोहिते हॉटेल समोर, एकलहरारोड नाशिकरोड यास मोठ्या शिताफीने पकडुन त्यास ताब्यात घेतले.
त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सद्दाम सलिम मलिक, वय-३३वर्षे, नाशिक असे सांगितले. त्यास गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस केली असता संशयित आरोपी सद्दाम याने त्याचा साथीदार योगेश पगारे, रा-चेहडी याच्या मदतीने जुन्या वादाची कुरापत काढुन प्रमोद वाघ यास जिवेठार मारल्याची कबुली दिली.
आरोपीला पुढील तपासकामी नाशिकरोड पोलीस ठाणे यांचे ताब्यात दिले आहे.
सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त गुसंदिप मिटके, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ चे पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलिस उप निरीक्षक रविंद्र बागुल, विशाल काठे, प्रविण वाघमारे, प्रशांत मरकड, प्रदिप म्हसदे, संदिप भांड, नाझीमखान पठाण, विशाल देवरे, धनंजय शिंदे, समाधान पवार, जगेश्वर बोरसे आदींनी केली आहे.