एकलहरे परिसरात दुसरा बिबट्या जेरबंद…… शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला…..
काही दिवसांपूर्वी एकलाहारे परिसरात बिबट्यला जेरबंद करण्यात आले होते. याच एकलाहरे परिसरात असलेल्या गंगावाडी भागात धुमाकूळ घालणाऱ्या अजून एक बिबट्याला अखेर आज पहाटेच्या सुमारास वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे त्यामुळे या भागातील नागरिक व शेतकऱ्यांनी सुटकेचा निस्वास सोडला आहे.
ए
कलहरे गंगावाडी परिसरात गेल्या काही दिवसापासून बिबट्याचे नागरिकांना दर्शन होत होते त्यामुळे सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी येथील नागरिकांनी व विभागाकडे केली होती. त्यांच्या या मागणीनुसार वनविभागाने अरुण विश्राम धनवटे मौजे गंगावाडी एकलहरे यांचे मालकी गट क्रमांक 409 परिसरात पिंजरा लावला होता परिणामी या पिंजऱ्यात आज पहाटे सहा ते सात वर्षाचा नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला. दरम्यान बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला असल्याचे समजतात नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

