प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी लिखित ६ पुस्तकांचे प्रकाशन…
डॉ. राम कुलकर्णी यांचे लेखन वाचकांसाठी प्रेरणादायी…. डॉ. सौ. दीप्ती देशपांडे ” डॉ. राम कुलकर्णी व प्रा. सौ. नीता कुलकर्णी यांनी केलेले चरित्रलेखन विद्यार्थ्यांना तसेच वाचकांना प्रेरणादायी असून या पुस्तकांमुळे बालसंस्काराचे कार्य प्रभावीपणे होईल, ” असे गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव प्राचार्या डॉ. सौ. दीप्ती देशपांडे यांनी प्रतिपादन केले.
स्वयंविकास प्रबोधिनी तर्फे गोखले एज्युकेशन सोसायटीचे विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी व प्रा. सौ. नीता कुलकर्णी यांनी लिहिलेल्या एकूण ६ चरित्र पुस्तकांचे प्रकाशन समारंभ व स्वयंविकास पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या शर्मन हॉल येथे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी त्या अध्यक्षीय मार्गदर्शन करताना बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी, सौ. नीता कुलकर्णी,, प्रा. डॉ. एकनाथ पगार,आरुषी प्रकाशनचे अनिल क्षीरसागर, आरोग्य चिंतन फाउंडेशनचे डॉ. विजय कुलकर्णी, स्वयंविकास प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ. सतीश महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते एकूण ५ पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच डॉ. राम कुलकर्णी व मृदुला देवधर यांनी लिहिलेल्या ‘ माईंड जिम अँड पार्लर ‘ या पुस्तकाचे प्रकाशन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात स्व. डॉ. म. बा. कुलकर्णी यांचे स्मृती प्रित्यर्थ प्रा. डॉ. एकनाथ पगार यांचे ‘ मराठी भाषा काल, आज आणि उद्या या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. तसेच स्वयंविकास प्रबोधिनी तर्फे स्वयंविकास पुरस्कार विविध क्षेत्रातील व्यक्तींना प्रदान करण्यात आले. यात शिवाजीराव महाजन ( कायदा व सुव्यवस्था), रवींद्र मालुंजकर ( सूत्रसंचालन), योगेश बोडके ( ग्रामीण विकास ) मधुकर सातपुते (कृषी), स्वप्निल सानप (उद्योग) , किशोर महाजन ( पारंपरिक व्यवसाय ), श्रीमती संगीता पाटील (योग प्रसार ), संगीता जाधव (जनसक्षमीकरण ), सरिता गोसावी ( ज्ञाना प्रबोधिनी संस्था), कीर्ती निरगुडे ( महिला बालकल्याण) पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर कुलकर्णी, पुरस्कार वाचन प्रा. जयंत भाभे, डॉ. अनिल सावळे, सौ. विदिता कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्नेहा रत्नपारखी यांनी केले.