रविवारी साधना मॅरॅथॉन चे आयोजन…… स्पर्धकांना भाग घेण्याचे आवाहन…….
एकलहरे येथील साधना एज्युकेशन तर्फे येत्या रविवार ९ फेब्रुवारी रोजी साधना मॅरॅथॉन चे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी ६ वाजता एकलहरे रोड येथून शाळेपासून या मॅरॅथॉन ला सुरुवात होणार आहे. मॅरॅथॉन मध्ये शालेय गट १४ वर्षा आतील ३ की.मी., शालेय गट १७ वर्षा आतील ६ की.मी., खुल्या गट १८ ते २९ वर्ष ६ की.मी, खुला गट ३० ते ३९ वर्ष ६ की.मी, खुला गट ४० ते ५९ वर्ष ३ की.मी, ६० वर्षांवरील खुला गटासाठी ३ की.मी मॅरॅथॉन आयोजित करण्यात आली असून प्रत्येक गटातून जिंकणाऱ्या पहिल्या तीन स्पर्धकांना बक्षिसे देण्यात येणार आहेत.
मॅरेथॉनमध्ये भाग घेणाऱ्या सर्व सहभगी सदस्यांना टी शर्ट, आकर्षक मेडल देण्यात येणार असून जास्तीत जास्त संख्येने भाग घेण्याचे आवाहन साधना एज्युकेशन तर्फे करण्यात आले आहे.