कत्तलीसाठी जाणा-या ४ गायींची सुटका…… गुंडा विरोधी पथकाची कारवाई……
गुंडा विरोधी पथकाने कत्तलीसाठी जाणा-या ४ गायींची सुटका केली आहे.m १९ डिसेंबर रोजी सकाळी गुंडा विरोधी पथकाला म्हसरुळ पोलीस ठाणे हद्यीत पेठ रोड कडुन नाशिक शहरात कत्तलीसाठी गायी जाणार असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने त्वरित पेठ रोड येथील न्यु नाशिक टोइंग सर्व्हिस तवली फाटा जवळ सापळा लावुन थांबले असता पेठ रोड कडुन नाशिक कडे येतांना एम.एच.१५ ई.जी. ३०८५ हे वाहन दिसले. सदर वाहनास थांबविले असता वाहनात ४ गोवंश जातीच्या गायी कत्तलीसाठी नाशिक येथे घेवुन जात असतांना वाहनावरील चालक संशयित इरफान नुर कुरेशी वय-२७ वर्षे रा. घर नं २९६९ काळे चौक, मोठा राजवाडा, वडाळानाका, नाशिक हा सदरचे गोवंश जातीचे जनावरांची वाहतुकीसाठी वाहन मालक समीर पठाण रा. सादीक नगर, वडाळागाव नाशिक यांनी पाठविल्याचे सांगितले. सदरच्या गायी हया कत्तलीसाठी खरेदी करणारे आरोपी मन्नन कुरेशी रा. नानावली नाशिक व शालम चौधरी व आवेश कुरेशी रा. बागवानपुरा नाशिक सध्या फरार असुन त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. सदर ४ गोवंश जातीच्या गायींची सुटका करुन त्यांना गोशाळेत सोडण्यात आले आहे. कारवाई दरम्यान जिवंत जनावरे व वाहन असा एकुण ४,१०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरच्या कारवाईत वाहन चालक, वाहन मालक व गोवंश जातीचे जनावरांची कत्तलीसाठी खरेदी करणा-या अशा एकुण पाच जणांविरुध्द म्हसरुळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णीक, पोलीस उप आयुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, दिलीप सगळे, विजय सुर्यवंशी, प्रदिप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, सविता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे.