नाशिकरोड येथील व्यापाऱ्याला लुटणाऱ्या संशयित अटकेत…..नव्या दरोड्याच्या तयारीत होते…. उपनगर पोलीसांची कारवाई…….
लॅमरोडला नाशिकरोड येथील व्यापाऱ्यावर हल्ला करणाऱ्या आणि दरोड्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना उपनगर पोलिसांनी अटक केली असून पळून गेलेल्या इतर साथीदारांची शोध सुरू केले आहे.
सुवर्ण सोसायटी जाधव मळा, नाशिकरोड येथील कार्यालयाचे तोडफोड करून फिर्यादी व त्याचे मित्रांना मारहाण करून त्यांना धारधार हत्यारांनी जिवेठार मारण्याची धमकी देवुन फिर्यादी कडुन ५०००/- रूपये रोख रक्कम बळजबरीने चोरून नेली होती. उपनगर पोलीस ठाण्यात २३ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, यांनी तात्काळ उपनगर पोलीस ठाण्याचे रात्र गस्त अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक सुयोग वायकर, व गुन्हे शोध पथकाचे पोलिस उप निरीक्षक प्रभाकर सोनवणे, विनोद लखन, पंकज कर्पे, सुरज गवळी, संदेश रघतवान, तसेच सुंदरनगर पोलीस चौकीचे बरेलीकर, देवा भिसे, यांना आरोपींचा तात्काळ शोध घेणे बाबत सुचना करून स्वताः सदर कारवाई कामी पुढाकार घेवुन नाशिकरोड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अमंलदार विजय टेमगर, नाना पानसरे, विशाल कुवर, समाधान वाजे, अजय देशमुख, यांना सुध्दा सदर घटनेची माहिती देवुन आरोपींचा शोध घेणे कामी माहिती दिली होती.
गुन्हयातील आरोपींचा शोध घेत असतांना रात्री ०२:४० वाजेचे सुमारास शंकुता पेट्रोलपंप जवळ जयभवानी रोडला लागुन असलेल्या मोकळया मैदानामध्ये एक कार व कारच्या आजुबाजूला काही जण सशंयीतरित्या उभे असल्याचे दिसल्याने त्यांची विचारपुस करायला जात असतांना पोलीसांना पाहुन सदर कार मध्ये काही इसम बसुन कार घेवुन भरधाव वेगाने पळुन गेले.
नाशिकरोड गुन्हे शोध पथकाने त्यांचा पाठलाग केला पंरतु कार हि भरधाव वेगाने निघुन गेली. सदर ठिकाणी कारच्या बाजुला उभे असलेले इसम अंधाराचा फायदा घेवुन पळत असतांना सहायक पोलिस निरीक्षक सुयोग वायकर, विनोद लखन, पंकज कर्पे, सुरज गवळी, संदेश रघतवान यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना जागीच पकडले. संशयितांना ताब्यात घेऊन घेवुन पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे ताब्यात एक बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्टोल, दोन जिवंत काडतुसे, एक लोखंडी कोयता, एक नायलॉन दोर व मिरची पुड असे दरोड्याचे साहित्य मिळुन आले. स्वप्नील उर्फ भुषण सुनिल गोसावी वय २३ वर्षे, रा. आंबेडकर नगर, टाउनशिप ओझर नाशिक, दानिश हबीब शेख वय २३ वर्षे, रा. कोठुळे सर्व्हिस स्टेशन शेजारी, विहीतगाव नाशिकरोड नाशिक, बबलु रामधर यादव, वय २९ वर्षे रा. वरची गल्ली, सुंदरनगर, दे. गाव, नाशिकरोड असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशितांची नावे आहेत. कारमध्ये पळुन गेलेल्या इतर साथीदारां बाबत चौकशी केली असता त्यांनी सागर म्हस्के, तुषार पाईकराव, सुरज भालेराव, अनिकेत उर्फ शब-या देवरे, रोहित लोंढे उर्फ भु-या या इतर साथीदारांची नावे सांगितली.
संशितांकडे मिळून आलेल्या दरोड्याचे पुर्व तयारीचा मुद्देमाल ताब्यात घेवुन सदर त्यांच्याविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात भादवी कलम ३१०(४), ३१०(५), ३(५) सह भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५, ४/२५ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५, १४२ प्रमाणे दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक प्रभाकर सोनवणे करित आहेत.
स्वप्नील उर्फ भुषण सुनिल गोसावी, दानिश हबीब शेख, बबलु रामधर यादव यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस अटकेत असतांना आरोपींना विश्वासात घेवुन विचारपुस केली असता संशितांनी २२ नोव्हेंबर रोजी रात्रीचे सुमारास त्यांचे साथीदारांसोबत मिळुन लॅमरोड येथे एका व्यापा-याची चार चाकी गाडी अडवुन गाडीची तोडफोड करून, व्यापारास मारहाण करून, गाडीतील पैशाची बॅग चोरी केली असल्याचे कबुली दिली आहे. तसेच त्यांनी भालेराव मळा, जयभवानी रोड, नाशिकरोड, येथे एका किराणा दुकानदारास मारहाण करण्याचा प्रयत्न करून त्याचे दुकानाची तोडफोड केली, तसेच सुवर्ण सोसायटी, जाधव मळा, देवळाली गाव, नाशिकरोड, येथील सोसायटी कार्यालयाचे तोडफोड करून तेथे बसलेल्या इसमांना मारहाण करून त्यांचेकडुन पैसे चोरी केली असल्याची कबुली दिली असुन चोरी केलेली रक्कम त्यांचे इतर साथीदार घेवुन गेले असल्याचे सांगितले आहे. गुन्हयातील अटक आरोपीतां व्यतिरीक्त त्यांचे फरार असलेल्या इतर साथीदारांचा शोध सुरू असुन आरोपिंकडुन आणखीन काही गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता आहे.
सदर कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप आयुक्त मोनिका राउत मॅडम, सहायक पोलीस आयुक्त नसचिन बारी साो यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ जितेंद सपकाळे, पोलिस निरीक्षक संजीव फुलपगारे, सहायक पोलिस निरीक्षक सुयोग वायकर, पोलिस उप निरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोउपनि सुरेश गवळी, विनोद लखन, इम्रान शेख, पोहवा बरेलीकर, पंकज कर्पे, सुरज गवळी, संदेश रगतवान, जयंत शिंदे, गौरव गवळी, अनिल शिंदे, सुनिल गायकवाड, सौरभ लोंढे, देवा भिसे, तसेच नाशिकरोड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अमंलदार विजय टेमगर, नाना पानसरे, विशाल कुवर, समाधान वाजे, अजय देशमुख, आदींनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक प्रभाकर सोनवणे करत आहे.