Homeक्राईममाजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार; कोयत्याने वार
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार; कोयत्याने वार

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचावर अज्ञातानी केलेल्या गोळीबारामध्ये मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नानापेठ येथील त्यांच्या कार्यालयाबाहेर त्यांच्यावर हा गोळीबार करण्यात आला. दरम्यान या गोळीबारात वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली आहे. घरगुती वादातून हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे

या गोळीबारात वनराज हे गंभीर जखमी झाले होते, त्यानंतर त्यामना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर गोळीबार करणारे आरोपी लगेच घटनास्थळाहून फरार झाले. पुण्यातील मध्यवर्ती भागात ज्या ठिकाणी गोळीबार झाला तिथे रक्ताचा सडा पडला असून पोलिसांकडून हा सगळा परिसर बंद करण्यात आला आहे.

संध्याकाळी साडेआठच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी आंदेकर यांच्यावर हा गोळीबार केला. या घटनेनंतर घटनास्थळी समर्थ पोलिसांसह गुन्हे शाखेचे पोलिस दाखल झाले. आंदेकर यांच्यावर आधी गोळीबार करून कोयत्याने वार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हल्ल्याच्या आधी चौकातील लाईट घालवण्यात आली आणि वनराज हे एकटे असल्याचे पाहून हा हल्ला करण्यात आला.

घरातील कार्यक्रम असल्यामुळे आंदेकर यांच्यासोबत इतर सहकारी नव्हते हीच नेमकी संधी साधून दुचाकीवरून आलेल्या तीन ते चार जणांनी आधी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि नंतर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आंदेकर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान आंदेकर यांचा मृत्यू झाला. दरम्यान पुण्यातील मध्यवर्ती भागात गोळीबाराचा थरार घडल्याने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments