बिटको महाविद्यालयात प्राचार्य टी. ए. कुलकर्णी यांची जयंती व शिक्षक दिन उत्साहात साजरा ……..
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात शिक्षणाचा खरा अर्थ आपल्या आचार आणि विचारातून सांगणाऱ्या आणि शिक्षक हा उत्तम प्रशासक होऊ शकतो हे दाखवून देणाऱ्या गोखले एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य टी. ए. कुलकर्णी यांची जयंती व शिक्षक दिन साजरा करण्यात आला . याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी प्राचार्य टी. ए. कुलकर्णी यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच प्राचार्य टी. ए. कुलकर्णी, माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याचा उजाळा उपस्थित शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांसमोर उलगडला . याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पाठारे , डॉ. आकाश ठाकूर , मराठी विभागप्रमुख डॉ. के. एम. लोखंडे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सुनिता नेमाडे, पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे, डॉ. मेहता नागभीडे, डॉ. दीपक टोपे, डॉ. अनिल सावळे, डॉ. विद्युल्लता हांडे , डॉ. कांचन सनानसे , साहेबराव निकम, डॉ कृष्णा शहाणे, डॉ संतोष पगार, डॉ. विजय सुकटे डॉ विलास कांबळे , डॉ. सुधाकर बोरसे यासह वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते . विद्यार्थ्यांमध्ये संस्कार मूल्य रुजवणाऱ्या व त्यांच्यामध्ये जिज्ञासूवृत्ती जोपासणाऱ्या शिक्षकांना यावेळी शिक्षक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा
देण्यात आल्या . कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही यावेळी शिक्षकांना गुलाब पुष्प भेट देऊन शिक्षकांप्रति आदरभाव व्यक्त केला . भूगोल विभागातही शिक्षक दिन विद्यार्थ्यांनी साजरा केला .