शिखरेवाडी पासपोर्ट कार्यालयावर
स्पाच्या नावाखाली देहविक्री….. ४ मुलींची सुटका….. दोन जण ताब्यात…..
नाशिकरोड शिखरेवडी नाशिक पूना रोडवर असलेल्या पासपोर्ट ऑफिसर स्पा सेंटरच्या नावाखाली तिथे सुरू असलेल्या देह व्यावसायावर उपनगर पोलिसांनी कारवाई करीत ४ मुलींची सुटका केली आहे.
१४ फेब्रुवारी रोजी “स्टार झोन मॉल, दुसरा मजला, पासपोर्ट ऑफीसच्या वरती, नाशिक पुणे रोड, नाशिक रोड नाशिक येथील ” विवा स्पा नाशिक ” येथे मसाज सेन्टरच्या नावाखाली मुली ठेवुन वेश्या व्यवसाय चालविला जात आहे.” अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पथकाने विवा स्पा हे मसाज सेन्टर हे शॉप नं ३/बी, स्टार झोन मॉल, दुसरा मजला, पासपोर्ट ऑफीसच्या वरती, नाशिक पुणा हायवे, नाशिक रोड नाशिक येथे छापा टाकला असता सदर ठिकाणी सदर मसाज सेन्टरचा मॅनेजर अंकीत उर्फ गोलु रामदास साहु, व मदतनीस रूपेश कुमार बरार आणि त्यांचा मालक मयुर देव यांनी संगणमत करून मसाज सेन्टरच्या नावाखाली स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता सुटका केलेल्या नमुद ४ पिडीत महिला यांना पैशाचे प्रलोभन देवून देहव्यापार करण्यास लबाडीने प्रवृत्त करुन स्वतः भाडयाने घेतलेल्या विवा स्पा या मसाज सेंटर मध्ये जागा उपलब्ध करुन देवून पिडीतांना बोलावुन त्यांना ग्राहकास पुरवुन त्यांचेकडुन पैसे स्विकारून देहव्यापार करवून घेतांना मिळुन आले.
तसेच नमुद पिडीत महिलांना ग्राहकांसाठी वेश्यागमनास उदयुक्त करून वेश्याव्यवसायाच्या कमाईतील मिळकतीवर अवलंबून राहून वेश्याव्यवसायास प्रेरणा दिली. मसाज सेन्टरचा मालक मयुर देव, मॅनेजर अंकीत उर्फ गोलु रामदास साहु व रूपेश कुमार बरार यांच्याविरुध्द भादवि कलम ३७०, ३४ सह अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ कलम ३,४,५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई दरम्यान ४ पिडीत महिलांची सुटका करण्यात आली असून मॅनेजर अंकीत उर्फ गोलु रामदास साहु वय २४ वर्षे, रूपेश कुमार बरार वय २४ वर्षे या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राउत, सहायक पोलिस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे उपनगर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब दुकळे, सहायक पोलिस निरीक्षक सचिन चौधरी, पोलिस उप निरीक्षक उंडे, शेख, गौरव गवळी, अनिल शिंदे, मिलींद बागुल, मडवई, विजेकर, गोसावी आदी पथकाने केली असून सदर गुन्हयाचा तपास पोलिस निरीक्षक बाळासाहेब दुकळे करत आहेत.