प्यारा परिवार सोशल फाउंडेशन आणि नासिक सिंधी पंचायती तर्फे पाचव्या वधू वर परिचय संमेलनाचे आयोजन…..
नाशिक सिंधी पंचायत आणि प्यारा परिवार सोशल फाउंडेशन तर्फे सिंधी समाजासाठी आयोजित पाचवा वधू वर संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. सहधर्माचरण, सहनशीलता, संयम, सहकार्य, निष्ठा व कर्तव्यदक्षतेचे एक व्रत म्हणजे विवाह. भारतात विवाहाला सामाजिक संदर्भाबरोबरच भावनिक व श्रध्देचेही बरेच वरचे स्थान आहे. रविवार 9 जुलै रोजी तपोवन रोड येथील सिंधी समाजाच्या भव्य अशा वातानुकूलित रामी भवन हॉल मध्ये सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत वधू वर संमेलन संपन्न झाले. यावेळी राज्यातून तसेच भावनगर, बंगळुरू आदी ठिकाणावरून आलेल्या एकूण 75 इच्छुकांनी आपल्या परिवारासह संमेलनात सहभाग घेतला. नाशिक सिंधी पंचायत आणि प्यारा परिवार तर्फे आयोजित हा 5 वा वधू वर संमेलन होते.
हा वधू वर संमेलन शिक्षित, फारकत झालेले तसेच इतर सर्व इच्छुकांसाठी खुले होते. सर्वप्रथम सकाळी रजिस्ट्रेशन प्रक्रिया पार पडली त्यानंतर मुलं आणि मुलींची परिचय करण्यासाठी स्क्रीन वर परिचय देण्यात आले. विवाह मध्ये येणाऱ्या अडी अडचणी बाबत सल्लागार प्रकाश खटपाल यांनी आलेल्या परीवरांना मार्गदर्शन केले. दुपारी आलेल्या पाहुण्यांसाठी सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. दुपार नंतर इच्छुक परिवारांचे परिचय आणि बोलणी करून देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. भविष्यात अशा प्रकारे मोठ्या स्वरूपाचे वधू वर संमेलन आयोजित करण्यात येणार असून जास्तीत जास्त परीवरांनी आपल्या लग्न इच्छुक मुलं मुलींचे रजिस्ट्रेशन करावे असे आवाहन नासिक सिंधी पंचायतीचे अध्यक्ष एडवोकेट प्रकाश आहुजा आणि प्यारा परिवार सोशल फाउंडेशन चे शाम मोटवानी, सचिव शंकर जयसिंगांनी, यांनी केले आहे. नाशिक सिंधी पंचायतिचे अध्यक्ष एडवोकेट प्रकाश आहुजा, उपाध्यक्ष शाम मोटवानी, सेक्रेटरी शंकर जयसिंघानी, हेमंत भोजवानी, सतीश पजवानी, महेश नागपाल, अर्जुन रहेजा, दीपक चंदनानी, जॉनी वलेचा, प्रकाश कठपाल, मुकेश वलेचा, महेश नागपाल, एडवोकेट भारती कटारिया, एडवोकेट ज्योती आहुजा, रेणू नागपाल, कोमल पंजवानी, प्रिया साधवाणी, योगिता करमचंदाणी, अनिषा दंदवानी आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केले. यावेळी सिंधी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.