Homeताज्या बातम्यासाधना एज्युकेशनच्या शैक्षणीक इमारतीचे २४ ला भव्य उदघाटन..... स्व.सत्यभामा गाडेकर यांच्या...

साधना एज्युकेशनच्या शैक्षणीक इमारतीचे २४ ला भव्य उदघाटन….. स्व.सत्यभामा गाडेकर यांच्या पुतळ्याचेही होणार अनावरण

साधना एज्युकेशनच्या शैक्षणीक इमारतीचे २४ ला भव्य उदघाटन…..
स्व.सत्यभामा गाडेकर यांच्या पुतळ्याचेही होणार अनावरण…..

नाशिक रोड एकलहरा रोड येथील जिजामाता महिला शिक्षण प्रसारक व समाज सेवा मंडळ संचलित साधना एज्युकेशन इंग्लिश मिडीयम स्कुल आणि ज्युनियर कॉलेज या प्रशस्त, अद्यवत इमारतीचे उदघाटन व दिवंगत सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण बुधवार, दिनांक 24 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे.


शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्राच्या महिला आघाडी प्रमुख, नगरसेविका, शिवसेनेची बुलंद तोफ अशी ओळख असलेल्या दिवंगत सत्यभामा गाडेकर यांनी पूर्व भागात इंग्लिश मिडीयम शाळा व ज्युनियर कॉलेज सुरु करण्याचा मानस सन 2010 मध्ये पूर्णत्वास नेला.डिसेंबर 2023 पर्यंत लहान जागेत सुरु असलेली शाळा व कॉलेज आता अडीच एकर प्रशस्त जागेत उभारलेल्या दोन मजली इमारातीत आहे. प्रस्ताविकत चार मजले आहे. या अद्यावत व नैसर्गिक वातावरणात सुरु होत असलेल्या शाळा व कॉलेज इमारतीमध्ये प्रवेशव्दारावर स्व.सत्यभामा गाडेकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. प्रशासकीय कार्यालय व प्राचार्याचे दालन आहे. विद्यार्थ्यांसाठी भव्य मैदान असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कलामंच उभारण्यात आला आहे. मुलांना शालेय जीवनापासून संगणकाची आवड निर्माण व्हावी यासाठी भव्य कम्प्युटर लॅब, केमिस्ट्री लॅब, बायोलॉजी लॅब तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी लायब्ररी साकारण्यात आली आहे. त्याच सोबत सर्व वर्ग हे डिजिटल शिक्षण प्रणालीने जोडले असून शाळेत मुलांना संगीत, नृत्याचे धडे व अनेक खेळ शिकवले जाणार आहेत. सौ रश्मीताई उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण होईल.

युवा नेते, माजी मंत्री, आमदार आदित्य ठाकरे यांची यावेळी प्रमुख उपस्थितीत राहणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा पल्लवी गाडेकर यांनी दिली. कॉलेजच्या विद्यार्थ्यांना युपीएससी व एमपीएससीचे मार्गदर्शन मिळून स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार असल्याचे अध्यक्षा पल्लवी गाडेकर यांनी सांगितले.


सोहळ्यास उपस्थितीत राहावे असे आवाहन गाडेकर यांनी केले आहे.कार्यक्रमाचे संयोजन उपाध्यक्षा मनीषा वझरे, सचिव जयश्री गाडेकर, विश्वस्त योगेश गाडेकर, विशाल गाडेकर व शालेय समिती सदस्य, मुख्याधापक, शिक्षक, कर्मचारी वृंद करीत आहे.

Advertisement

Advertisementspot_imgspot_imgspot_imgspot_img
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments