दारूच्या नशेत पोलिसांनीच घेतले पोलिस ठाणे डोक्यावर……. अधिकाऱ्यांना अरेरावी……
दोघा मद्यपी पोलिसांचा पोलिस ठाण्यातच गोंधळ घातल्या प्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाची पोलिस निरीक्षकांनी घेतली गंभीर दखल करण्यात आला आहे. दारूच्या नशेत तर्रर्र होऊन वाहन चालवून दोघा मद्यधुंद पोलिस कर्मचाऱ्यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यातच धिंगाणा करीत पोलिसांनाच धमकाविले. नाशिकरोडचे वरिष्ठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांनी गुरुवारी रात्री कारवाई केली.
कोल्हापूर येथे भारतीय राखीव बटालियन, व सध्या मुंबईतील राजभवन येथे नेमणुकीस असलेला चांगदेव गीते आणि नाशिक शहर पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेला अशोक आघाव अशी या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.दोघे पोलिस कर्मचारी सिन्नर फाट्याकडून नाशिकरोडच्या दिशेने चारचाकी वाहन (एमएच १५ जेडी १०४४) चालवून येत राँग साईडने येत होते. त्यांच्या या प्रकारामुळे नाशिक-पुणे महामार्गावरील रहदारीला अडथळा निर्माण होत होता. याचवेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके हे गाडीतून पोलिस कर्मचाऱ्यांसह रात्र गस्तीवर जात होते.
त्यांना वाहनधारक व नागरिकांकडून या गैरप्रकाराबाबत माहिती मिळाल्यावर त्यांनी महामार्गावर राँग साईडने येत असलेल्या वाहनाजवळ जात चालक अशोक आघाव आणि त्याच्या शेजारी बसलेला चांगदेव गीते या दोघांना विचारणा केली. यावेळी दारूच्या नशेत तर्रर्र असलेल्या या पोलिस कर्मचाऱ्यांनी पोलिस अधिकाऱ्यांनाच अरेरावी करून दमबाजी केली, दोघेही एकत्र नसल्याने शेवटी या मद्यपींना ताब्यात घेऊन नाशिकरोड पोलिस ठाण्यात आणले. पोलिस ठाण्यातही या मद्यपी पोलिसांनी धिंगाणा घालून पोलिस ठाणे डोक्यावर घेतले. बिटको रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यावर त्यांनी मद्यपान केले असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने त्यांच्या विरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांनी कठोरपणे कायदेशीर कारवाई केल्याने पोलिस खात्यात चर्चेचा विषय ठरला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पवन चौधरी करीत आहेत.