सणांच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ २ मध्ये कोंबिंग ऑपरेशन……. गुन्हेगारांमध्ये धडकी….
दिवाळी उत्सवाच्या अनुषंगाने घरफोडी, चोरी, वाहनचोरी, जबरीचोरी या मालाविरुध्दच्या गुन्हयांना प्रतिबंध होणेसाठी तसेच रेकॉर्ड वरील गुन्हेगारां विरुध्द कारवाई करणेसाठी परिमंडळ-२ कार्यक्षेत्रात कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यांत आले. नाशिक पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ-२ मधील पोस्टे. हद्दीत ०८ नोव्हेंबर रोजी हे कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.
पोलिस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, व सहायक पोलिस आयुक्त आनंदा वाघ, यांच्या मार्गदर्शनाखाली रेकॉर्डवरील तसेच तडीपार एकुण १३५ गुन्हेगारांना चेक करुन, ६५ गुन्हेगारांचे चौकशी फॉर्म भरुन घेवून आवश्यक ती कारवाई करण्यांत आलेली आहे, ५० टवाळखोरां विरुध्द ११२/११७ प्रमाणे कारवाई केली आहे, कोटपा कायदयान्वये अंबड व देवळालीकॅम्प पोस्टे. हद्दीत एकुण ०८ केसेस करण्यांत आल्या, समन्स/वॉरंट मधील इसमांना चेक करुन १२ इसमांना समन्स तसेच ०५ इसमांना वॉरंटची बजावणी करण्यांत आली आहे.
रेकॉर्ड वरील माला विरुध्द, शरिराविरुध्दचे गुन्हेगार, तडीपार तसेच घातक हत्यारे, अग्निशस्त्र बाळगून गुन्हे करणारे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करुन दहशत निर्माण करणारे गुन्हेगारांना अचानकपणे कोम्बिंग, ऑलआउट, नाकाबंदी, इत्यादी कारवाईत चेक करुन, घरझडत्या आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करुन गंभीर गुन्हे उघडकीस आणून अटक करण्याची कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले.
दिवाळी उत्सवाच्या अनुषंगाने परिमंडळ-२ कार्यक्षेत्रातील प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीत तसेच सातपुर, अंबड एमआयडीसी भागात नियमित बंदोबस्ता व्यतिरिक्त अधिकचे फिक्स पॉइन्ट बंदोबस्त, पायी तसेच दुचाकी, चारीचाकी वाहनांची गस्त, असे विशेष बंदोबस्ताचे नियोजन करण्यांत आलेले आहे. नागरिकांनी देखील आपले मौल्यवान सामानाची सुरक्षिततेतेसाठी खबरदारी घेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात असे आवाहन परिमंडळ-२ च्या पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत यांनी केले आहे.