Homeअपघातनाशिकरोड गुरुद्वारा मागे घराला आग लागून नुकसान.....

नाशिकरोड गुरुद्वारा मागे घराला आग लागून नुकसान…..

नाशिकरोड गुरुद्वारा मागे घराला आग लागून नुकसान…..

नाशिकरोड गुरुद्वारा मागे पत्र्याच्या घरात लागलेल्या आगीत घरातील सामानाचे नुकसान झाले आहे.
नाशिक पूणे महामार्गवरील बिटको कॉलेज  जवळील गुरुद्वारा मागे असलेल्या एका बंगल्या बाहेर वॉचमन व घर कामगार यांच्या घराला संध्याकाळी भीषण आग लागली.  गुरुद्वारा मागील बिटको इंग्लिश मिडीयम शाळे समोरील नरेंद्र बिंद्रा यांचा “अमृत व्हिला” हा बंगला आहे. या बंगल्याच्या भिंती लगत घरकाम करणारे कामगार व इमारतीचे वॉचमन विलास विश्वनाथ निकम यांना पत्र्याचे घर तयार करुन दिले आहे. संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याने लाईट बंद होऊन वायरी जळू लागल्याने घरातील सर्व जण बाहेर पळून गेले. आरडाओरड केल्याने नागरिकांनी अग्निशमन दलाला कळविले. माहिती मिळताच अग्निशमक दलाचे मनोज साळवे, रामदास काळे,  प्रथमेश पुरी, किशोर तोरमड यांनी घटनास्थळी धाव घेऊन एका बंबाच्या सहाय्याने आग विझवली. आगीत जीवित हानी झाली नसली तरी घरातील कपडे, अंथरून, आदी सह गृहउपयोगी वस्तू जळून खाक झाले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments