नाशिकरोड गुन्हे शोध पथकची उत्तम कामगिरी १ आरोपी अटक…४ लाख ८५ हजाराच्या १३ मोटरसायकल हस्तगत
गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक शहर व जिल्ह्यातील अनेक भागातून मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. सदर गाडी चोरणाऱ्या चोरट्यांना पकडण्याचे आदेश पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिले होते. या आदेशानुसार नाशिकरोड पोलिसांनी गाडी चोरणाऱ्या चोरट्यांचा शोध सुरू केला होता
गेल्या महिन्यात सागर जाधव रा. पाथर्डी रोड नाशिक याची मोटरसायकल नाशिकरोड रेल्वे स्टेशन येथून चोरी गेली होती त्या बाबत सागरनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. सदर गुन्ह्याचा तपास सुरू असतांना परिमंडळ दोन मध्ये कार्यरत असलेले पोलीस नाईक विशाल पाटील यांना गुप्त बातमी मिळाली की, गाड्या चोरणारा संशयीत योगेश शिवाजी दाभाडे राहणार अशोक नगर, सातपूर हा नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसरात फिरत आहे.
विशाल पाटील यांनी वरिष्ठांना कळवले
नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील, उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे, विलास गांगुर्डे, सुभाष घेगडमल, विष्णू गोसावी, सचिन गावले, विशाल पाटील, मनोहर शिंदे, राकेश बोडके, केतन कोकाटे, सोमनाथ जाधव, समाधान वाजे, विशाल कुवर, महिंद्र जाधव, सागर आडणे, अजय देशमुख, योगेश रानडे, सागर पांढरे, मुश्रीफ शेख, स्वप्नील जुंद्रे आदींनी सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले.
संशयीत योगेश दाभाडे याने गुन्हयाची कबुली दिली त्याच्या कडून ४ लाख ८५ हजाराच्या १३ मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या आहे.