शिवीगाळ करणाऱ्या मित्राची बाजू घेतल्याचा राग आल्याने दारूच्या नशेतच केला मित्राचा खून……. संशयित आरोपी तात्काळ अटकेत
अंबड येथे मित्रांमध्ये शिवीगाळ होऊन वादात एक भाजी विक्रेता चा खून करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एका मित्राने शिवीगाळ करणाऱ्या मित्राची बाजू घेतली, म्हणून आपल्या जिवलग मित्रावर चाकूने वार करून खून केल्याचा धक्कादायक घटना गंगापूर पोलिस ठाणे हद्दीतील कार्बन नाका येथे घडली आहे. वारंवार नाशिकमध्ये किरकोळ कारणावरून होणाऱ्या खुनाच्या सत्राने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.
विश्वनाथ सोनवणे असे या मयत युवकाचे नाव असून, गंगापूर पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी रफिक शेख या तरुणाला त्याच्या एका मित्राने शिवीगाळ केली होती. या शिवीगाळ करणाऱ्या मित्राची मयत विश्वनाथ सोनवणे या मित्राने बाजू घेतली होती. याचा रफिक याला राग आला होता. काल रात्रीच्या सुमारास समशेर रफिक शेख, दीपक अशोक सोनवणे आणि आणखी दोन तीन मित्र दारू पिऊन गप्पा मारत उभे होते. त्यातच रफिक याने मागचा राग काढत इतर मित्रांसह विश्वनाथ याला मारहाण करून रागाच्या भरात त्याच्या पोटात चाकू भोकसल्याने त्याला गंभीर जखमी त्याचवेळी संशयितांनी त्याला दवाखान्यात दाखल केले पण अति रक्तस्राव झाल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.
या ठिकाणी तैनात असलेल्या पोलीस हवालदारांच्या सतर्कतेने संशयित आरोपी मित्रांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. गंगापूर पोलिसांनी या संशयितांना चौकशी केली असता, दोघांनी रागाच्या भरात खून केल्याची कबुली दिली.