देवळा येथील कांदा मार्केट शेतकऱ्यांनी बंद पाडले……सर्व शेतकरी आता देवळा कळवण रस्त्यावर बसले…..
देवळा येथील दौलतराव सोनूजी आहेर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी पूर्ववत लिलाव सुरू करण्यात आले परंतु शासनाने सांगितल्याप्रमाणे 2410 रुपयांनी हे शेतकऱ्यांचे कांदे खरेदी केले पाहिजे होते परंतु त्यापेक्षाही कमी भाव मिळत असल्याकारणाने शेतकऱ्यांनी आज देवळा कळवण रस्त्यावर आंदोलन सुरू केले आहे यामध्ये प्रामुख्याने 40 टक्के लावण्यात आलेला कर हा रद्द करावा तसेच नाफेडचे किंवा शासनाचे प्रतिनिधी यांनी मार्केट यार्ड मध्ये येऊन शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करावा आणि त्याला 2410 पेक्षा जास्त रेट मिळावा अशी मागणी आता प्रामुख्याने शेतकऱ्यांकडून केली जात आहे
त्यामध्ये तहसीलदार सूर्यवंशी तसेच पोलीस निरीक्षक पाटील यांनी मध्यस्थी करून व बाजार समिती सभापती योगेश आबा आहेर यांनी सांगितल्यानुसार सोमवारपासून नाफेडचे अधिकारी कांदा खरेदी करण्यासाठी येणार आहेत सर्वात जास्त शेतकऱ्यांनी नाफेडला कांदा द्यावा असे आवाहन करण्यात आलेले आहे
देवळा प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर