अनाधिकृत बॅनर व अनाधिकृत अतिक्रमण….. मनपा कर्मचाऱ्याला दमदाटी….. गुन्हा दाखल……
नाशिकरोड मनपा विभागीय कार्यालयातर्फे नाशिकरोड परिसरात अनधिकृत बॅनर व अनधिकृत अतिक्रमण विरोधात मोठी अतिक्रमण मोहीम राबविली जात असून ठिकठिकाणी कारवाई केली जात आहे.
13 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.00 वाजता रेल्वे स्टेशन परिसर समोर नाशिकरोड येथे मनपा अतिक्रमण विभागाचे अमित पवार हे सहकाऱ्यांसह नाशिकरोड हददीतील अनाधिकृत बॅनर व अनाधिकृत अतिक्रमण यांच्या विरोधात कारवाई करीत होते.
मनपा विभागीय अधिकारी प्रज्ञा त्रिभुवण मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली 09.30 वाजता सहकारी सिध्दांत गरूड, प्रभाकर अभंग, रंगनाथ मुठाळ व कर्मचारी यांच्यासोबत नाशिकरोड रेल्वे स्टेशन समोरील परिसरातील अनाधिकृत बॅनरवर कारवाई करित होते. त्याचवेळी लालचंद प्रकाश शिरसाठ यांनी रागात येवुन आमच्या गाडीला व काम करणा-या कर्मचाऱ्यांना आडवा होवुन म्हणाला की, माझे ‘न्याज’ कार्यक्रमाचे नाशिकरोड भागातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा नाशिकरोड, बिटको चौक व अनुराधा चौक नाशिकरोड येथील बॅनर तु का काढले? असा सवाल केला… ” आम्ही काढलेले बॅनरस हे विनापरवानगी बॅनर आहेत. ते आम्ही काढले आहेत. आम्ही काढलेल्या बॅनर बाबत आपणा कडे मनपा व पोलीस विभागा कडील शहर वाहतुक शाखेची परवानगी आहे का?” असे अमित पवार यांनी विचारले असता लालचंद शिरसाठ यांनी चिडुन आरडा-ओरड करून पवार यांच्या आंगावर येवुन अरेरावी करून, ” माझे पुढे लावलेले बॅनर काढाच, मग मी तुला अणि तुझे मानसानां बघतोच” असे बोलुन मला मारणे करिता अंगावर येवुन बाचाबाची करून शिवीगाळ केली. मनपा अतिक्रमण विभागाचे अमित नंदकिशोर पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात संशयित लालचंद प्रकाश शिरसाठ रा मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर, मालधक्का रोड, नाशिकरोड यांच्या विरोधात महाराष्ट्र मालमत्तेच्या विकृतिकरण प्रतिबंध करण्या करिता अधिनियम 1995 चे उल्लंघन कलम 3 आणि इतर कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास गायकवाड करीत आहेत.