रामी भवन येथे रविवारी जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन…..
नाशिक काठेगल्ली तपावन लिंक रोड येथील रामी भवन याठिकाणी जागतिक बुद्धिबळ दिनाचे औचित्य साधत बॉटविनिक चेस स्कूल नाशिक आणि आर. के. कलानी ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार २० जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता ही स्पर्धा होणार असल्याची माहिती बॉटविनिक चेस स्कूलचे संचालक व जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे पदाधिकारी सुनिल शर्मा यांनी पत्रकार परीषदेत दिली.
स्पर्धेत हजारो रुपयांची रोख स्वरूपातील बक्षीसे आणि ७३ स्मृतिचिन्हे विविध वयोगटातील विजेत्यांना प्रदान केली जाणार आहेत. ही स्पर्धा स्वीस लिग पद्धतीने खेळविली जाणार आहे. पारितोषिक वितरण समारंभास ग्रॅण्डमास्टर प्रवीण ठिपसे उपस्थित राहणार आहे. बुद्धिबळ खेळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १० व्यक्तींना यावेळी सन्मानित केले जाणार आहे. तसेच प्रफुल्ल झंवेरी यांना व्यास पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित केले जाणार आहे.
स्पर्धेसाठी भूषण चेस अकॅडमी, अभिज चेस अकॅडमी, विकी चेस डॉट कॉम, चॅम्पियन्स चेस अकॅडमी, बोटविनिक चेस स्कूल, रितिका कलानी, नाशिक सिंधी पंचायतचे उपाध्यक्ष श्याम मोटवानी, सेक्रेटरी शंकर जयसिंघानी यांचे सहकार्य लाभत आहे. याप्रसंगी हरिष गुरुनानी, हरिष कटारिया, यशवंत तलरेजा, प्रेम हरियाणी, सनी डोडानी, जॉनी वलेचा, चंद्रकांत भाटिया, मनोज भाटिया उपस्थित होते. इच्छुकांनी स्पर्धेत भाग घेण्यासाठी महाराज सुनील शर्मा ९३७३९०६००५,
विनायक वाडिले ७२७६३७१९९५
यांना संपर्क करावे आहे आवाहन करण्यात आले आहे.