बिटको महाविद्यालयात सर डॉ. मो. स. गोसावी सरांना द्वितीय पुण्यस्मरणा निमित्त अभिवादन………
नाशिकरोड :- गोखले एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव व महासंचालक तसेच व्यवस्थापन अभ्यासक्रमाचे प्रणेते,आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आणि भारतीय ज्ञान परंपरेचे प्रवक्ते व मार्गदर्शक, सारस्वतांचे सारस्वत आदरणीय गुरुतुल्य सर्व गुणसंपन्न शिक्षण महर्षी कै. सर डॉ. मो. स. गोसावी साहेबांना दुसऱ्या पुण्यस्मरणा निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे, उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पठारे, डॉ. आकाश ठाकूर, डॉ. सतीश चव्हाण, पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे, कुलसचिव राजेश लोखंडे, ग्रंथपाल एस. व्ही. चंद्रात्रे यासह विभागप्रमुख, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.