पेट्रोलिंग दरम्यान खुनाचा फरार आरोपी ताब्यात…. आठ मोटार सायकल जप्त….. उपनगर पोलिसांची कामगिरी…..
रात्रीचे पेट्रोलींग दरम्यान खुनाच्या गुन्हयात २ महिन्या पासुन फरार असलेला अट्टल गुन्हेगाराला पकडुन चोरीच्या ०८ मोटारसायकल उपनगर पोलिसांनी हस्तगत करून उल्लेखनिय कामगिरी केली आहे.
नाशिक शहरात स्टॉप अॅण्ड सर्च, टवाळखोर कारवाई, नाकाबंदी तसेच पभावी पणे पेट्रोलींग सुरू असताना ०३ जुलै रोजी रात्री ११ वाजेह्या सुमारास उपनगर पोलीस स्टेशनचे हददीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ हे स्वताः व गुन्हे शोध पथकाचे पोलिस उप निरीक्षक प्रभाकर सोनवणे, विनोद लखन, पंकज कर्पे, सौरभ लोंढे, सुरज गवळी, संदेश रगतवान, आदी डी.जी.पी. नगर भागात पेट्रोलींग करत असतांना पोलीस हवालदार विनोद लखन यांना दोन जण संशयीत हे एका पल्सर गाडीने विना क्रमांकाची एक्टिव्हा मोटर सायकलला टोचन करून घेवुन जात असतांना दिसल्याने विनोद लखन यांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला पण त्यानी गाडया जागेवर सोडुन पळ काढला. पथकाने लागलीच त्यांचा पाठलाग करून त्यांना जागीच पकडले. विना क्रमांकाची मोपेड मोटर सायकल ची पडताळणी केली असता त्याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होत. संशयित नविन शिलन सोनकांबळे वय २२ वर्षे, रा. ४०२ म्हाडा कॉलनी, पाथर्डी गाव, नाशिक, अभिजीत भिमा ठोके, वय १९ वर्षे, रा. पाथर्डी गाव, नाशिक यांच्याजवळ असलेली पल्सर मोटार सायकल बाबत चौकशी केली असता त्यांनी सदरची मोटार सायकल मुंबई येथुन चोरी केलेली असल्याचे सांगितले. नविन शिलन सोनकांबळे विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असुन तो गुन्हया केल्यापासुन फरार असल्याचे समजले.
अधिक तपासात आरोपींनी नाशिक शहर व मुंबई, ठाणे, हददीतुन एकुन ०८ मोटार सायकल चोरी केले असुन ठाणे, मुंबई येथुन मोटर सायकल चोरी करून नाशिक शहरात विक्री करणा-या साठी लपवुन ठेवलेल्या मोटर सायकली आरोपीकडुन जप्त करण्यात आल्या आहेत.खालील गुन्हे उघडकीस आले आहे. आरोपींकडून एकूण ७,६०,००० /- रू किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदर कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप आयुक्त मोनिका राउत मॅडम, सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ, पोलिस निरीक्षक संजीव फुलपगारे, पोलीस उप निरीक्षक प्रभाकर सोनवणे, विनोद लखन, सहायक पोलिस उप निरीक्षक संतोष जाधव, सुरज गवळी, पंकज कर्पे, सौरभ लोंढे, संदेश रघतवान, जयंत शिंदे, गौरव गवळी, अनिल शिंदे, सुनिल गायकवाड, शशिकांत राउत आदींनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक प्रभाकर सोनवणे करत आहे.