Homeताज्या बातम्यापळसे गावात बिबट्याचे दर्शन.....शेतकरी, विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..... गावकऱ्यांची पिंजरा लावण्याची मागणी....
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

पळसे गावात बिबट्याचे दर्शन…..शेतकरी, विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण….. गावकऱ्यांची पिंजरा लावण्याची मागणी….

नाशिकरोड पळसे प्रतिनिधी:- श्री संत आईसाहेब महाराज न्यू इंग्लिश स्कूल परिसरात भर दुपारी बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकरी विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नाशिक तालुक्यातील एमआयडीसी पंपिंग रोड परिसरातील श्री संत आईसाहेब महाराज न्यू इंग्लिश स्कूल व साठे एखडे पगार मळा परिसरामध्ये बिबट्याचे मादी व पिलासह दिवसाढवळ्या वावर दिसून आला. पळसे गावातील दारणा नदी काठ एमआयडीसी परिसर या भागामध्ये शेतकऱ्यांच्या शेतावरच वस्त्या वाढल्याने दैनंदिन शेतीचे काम या भागामध्ये शेतकरी करत असतात. सदर भागांमध्ये बिबट्यांना लपण्यासाठी नाला परिसरामध्ये व नदीकाठ परिसरात मोठ्या प्रमाणात जागा असून काही भागात मक्याच्या क्षेत्राकडेही बिबट्याने वाटचाल केल्याने उभ्या मका पिकामध्ये बिबटे फिरत असताना दुपारच्या सुमारास द्राक्ष बागांमध्ये करणारे शेतकरी समाधान गायधनी यांना बिबट्या दिसला. अचानक बिबट्याचे दर्शन झाल्याने या भागातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीती पसरली आहे.

सदर बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी या ठिकाणी दोन पिंजरे लावण्याची व्यवस्था वनविभागाने करावी अशी मागणी व ग्रामपंचायत सरपंच सौ ताराबाई गायधनी आणि ग्रामस्थांनी केली आहे. या भागात सकाळ दुपार दोन सत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी शिकत असलेल्या श्री संत आईसाहेब महाराज न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी या मळ्यामधून व परिसरातून शाळेमध्ये जात असतात.

गावातील शेतकरी समाधान महादू गायधनी यांच्या शेताजवळच्या निवासस्थाना जवळ कांदा चाळीत काही काम करत असताना त्यांच्या कुटुंबातील एका सदस्यांनी सदर बिबट्या आढळला सदर बिबट्या सोनाली समाधान गायधनी व तिच्या लहान बहिणीने बिबट्या बघितला. श्री संत साहेब महाराज न्यू इंग्लिश स्कूल शाळेतील शिक्षकांनी व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सूचना देऊन विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी तसेच परिसरातील सर्व शेतकरी कुटुंबांनी लहान मुलांची जनावरांची व स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी सरपंच सौ ताराबाई गायधनी यांनी केले आहे परिसरातील बिबट्यांचा वावर कायमच असतो या भागामध्ये असंख्य बिबटे या पूर्वी पकडले गेलेले आहेत

वनीकरण विभागाने त्वरित दोन पिंजरे लावावेत व बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी या भागातील शेतकरी समाधान गायधनी जयंत गायधनी बाबुराव चौधरी दिलीप साठे. भारत गायधनी. घमाजी गायधनी सुनील गायधनी. दिलीप गायधनी. नवनाथ गायधनी. सुनील पवार. विलास चौधरी आदींनी केली आहे.

नाशिकरोड पळसे प्रतिनिधी
नंदू त्र्यंबक नरवाडे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments