Homeताज्या बातम्यादेवळाली कॅम्प समस्यामुक्ती उपक्रमाला उत्स्फूर्त रहिवाशांचा प्रतिसाद...... महिनाभर चालणार उपक्रम....फाइट फॉर देवलाली'चा...
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

देवळाली कॅम्प समस्यामुक्ती उपक्रमाला उत्स्फूर्त रहिवाशांचा प्रतिसाद…… महिनाभर चालणार उपक्रम….फाइट फॉर देवलाली’चा लढा तीव्र कराः रतन चावला

देवळाली कॅम्प समस्यामुक्ती उपक्रमाला येथील रहिवाशांनी उत्सुर्फ प्रतिसाद दिला आहे.
लोकशाहीत नागरिकांना आपले हक्क मागण्यासाठी लढावे लागते. हा लढा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या माध्यमातून आम्ही सुरू केला आहे. यात जनतेने सहभागी होऊन तो आणखी तीव्र करावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सिंधी सेलचे प्रदेशाध्यक्ष रतन चावला यांनी केले.
गेल्या चार वर्षांपासून देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डात लोकप्रतिनिधी नसल्याने रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पंधरा समस्या सुटण्यासाठी फाइट फॉर देवलाली हा उपक्रम पक्षाच्या वतीने सुरू करण्यात आला. या उपक्रमाचा प्रारंभ सिंधी सेलचे प्रदेशाध्यक्ष रतन चावला यांच्या हस्ते झाला. यावेळी कार्यकर्त्यांनी शहरातील वेगवेगळ्या भागांत समस्यांची पत्रके वाटत नागरिकांच्या सूचना तथा अभिप्राय जाणून घेतल्या. हा उपक्रम महिनाभर चालणार असून जनतेच्या उपस्थितीत प्रशासनाला समस्या सोडवण्याचे साकडे घालत निर्वाणीचा इशारा लोकशाही मार्गान दिला जाणार आहे.

देवळाली कॅम्प राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘फाइट फॉर देवलाली’ अभियानात सिंधी सेलचे प्रदेशाध्यक्ष रतन चावला सह शहराध्यक्ष अॅड. बाळासाहेब आडके, ज्येष्ठ नेते एन. डी. गोडसे, रवींद्र भदाणे, विधानसभा अध्यक्ष प्रशांत बच्छाव, युवक तालुकाध्यक्ष व बेलदचे सरपंच मोहनीश दोंदे, संजय गोडसे, संजय गिज, युवक शहराध्यक्ष जयेश गरुड, अॅड. सुभाष हारक आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments