ताज्या बातम्या नाशिक

नाशिकला पोलिस अधिकारांच्या बदल्या…. 11 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या…..

नाशिकला पोलिस अधिकारांच्या बदल्या…. 11 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या…..

नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील 11 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या असून तसे आदेश पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी काढले.

यामध्ये पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर शिवाजी कड अंबड पोलिस ठाणे प्रभारी, भद्रकाली पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र रघुनाथ पाटील पंचवटी पोलीस ठाणे प्रभारी, अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश आनंदराव चौधरी भद्रकाली पोलिस ठाणे प्रभारी, उपनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जितेंद्र भीमराव सपकाळे नाशिकरोड पोलीस ठाणे प्रभारी, देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयंत भारत शिरसाट उपनगर पोलिस ठाणे प्रभारी, चिंचोले पोलिस चौकीचे पोलिस निरीक्षक मनोहर रामा कारंडे अंबड पोलिस ठाणे दुय्यम, सातपूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास रोहिदास पाटील चिंचोळे पोलिस चौकी प्रभारी, नियंत्रण कक्षातील पोलिस निरीक्षक संजय मारुती पिसे आडगाव पोलीस ठाणे प्रभारी, आडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन मुरलीधर खैरनार अंबड पोलीस ठाणे दुय्यम, भद्रकाली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीनिवास भगवान देशमुख देवळाली कॅम्प पोलिस ठाणे प्रभारी, नाशिकरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक उत्तमराव गिरी सरकारवाडा पोलिस ठाणे दुय्यम पोलीस निरीक्षक पदी बदली करण्यात आली. अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राकेश हांडे यांना अजून नियुक्तीच्या प्रतीक्षेत नियंत्रण कक्षात ठेवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *