चेट्रीचंड झुलेलाल महाराज जयंती अध्यक्षपदी भरत बलवाणी….. कार्याध्यक्ष सोनू रामवानी…..
सिंधी बांधवांचे कुळदैवत भगवान पूज्य झुलेलाल जयंती ३० मार्च रोजी देवळाली कॅम्प येथे साजरी होणार आहे. सिंधी सेवा मंडळ तर्फे नुकतीच घेण्यात आलेल्या बैठकीत चेटीचंड पूज्य झुलेलाल महाराज जयंती अध्यक्षपदी भरत बलवाणी तर कार्याध्यक्षपदी सोनू रामवाणी यांची एकमताने निवड करण्यात आली.
सिधु सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगवान कटारिया यांच्या अध्यक्षतेखाली आगामी होणाऱ्या चेट्रीचंड झुलेलाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाची रुपरेषाबरोबरच नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यात उपाध्यक्ष निर्मल धामेजा, खजिनदार किशोर चावला, कार्यकारी सदस्य विजय कुकरेजा, आनंद नागदेव, सुरेश खत्री, महेश बोधानी, पवन तेजवाणी आदींची निवड करण्यात आली. यावेळी बैठकीस सिंधी बांधव पदाधिकारी उपस्थित होते.