बातमी का केली म्हणून पत्रकारावर हल्ला करणाऱ्या दोन जणांविरोधात गुन्हा दाखल……
अवैध धंदेची बातमी केल्याच्या रागातून पत्रकाराला अवैध धंदे चालकांकडून मारहाण, संशयित विरोधात अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबडसह नाशिक शहर परिक्षेत्रात अवैद्य धंदे करणाऱ्या टोळीचा उच्छाद सुरू आहे, या टोळीने अंबड येथे काम करणारे दिव्य मराठीचे डीबी स्टार रिपोर्टर साईप्रसाद अनिल पाटील यांना मारहाण केली असून, तु दिव्य मराठी या वृत्तपत्रात टीव्ही स्टार या मालिकेत आमची बातमी का छापली. म्हणून रस्त्यात अडवून साईप्रसादला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
संशयित राहुल काशिनाथ शेळके व त्याचा मित्र रमजान राजू शेख या दोघांनी साईप्रसादला मारहाण करून त्याचा मोबाईल हिसकावून घेतला आहे, तसेच त्याच्या खिशातील रोख रक्कम काढून घेतली आहे, सदरचा प्रकार दत्त चौक सिडको येथे महावितरण कार्यालयासमोर घडला असून, संशयित आरोपी राहुल काशिनाथ शेळके वय- वर्ष 38 राहणार- मल्हार खान झोपडपट्टी गंगापूर रोड, व रमजान राजू शेख वय -वर्ष 25 अजमेरी मशीद शिवाजी चौक भद्रकाली नाशिक यांनी साईप्रसादला बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे, या संदर्भात अंबड पोलीस ठाणे येथे या दोन्ही संशयित विरोधात 311 कलम नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.