चेहडी येथे स्पोर्ट बाईकच्या धडकेत जावई आणि सासऱ्याचा मृत्यू…..
नाशिकरोड चेहडी येथे नाशिक पुणे मार्गावर झालेल्या दोन दुचाकींच्या अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पळसे येथून नाशिकरोडकडे येत असताना अपघातात जावई व सासऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

महेश भारत नरवाडे (वय ३५) राहणार कारखाना रोड, पळसे व त्याचे सासरे अनिल बाबुराव लाजरस (वय ७१) राहणार गोरेवाडी नाशिकरोड हे एक्टिवा दुचाकी क्रमांक MH १५GT ८८३० वरून पळसे वरून नाशिक रोड कडे येत असताना समोरून भरधाव वेगात येणाऱ्या थंडर स्पोर्ट बाईकवर
श्रमिक नगर, निळकंठेश्वर मंदिरा जवळ एक्टिवाला जोरदार धडक दिली, त्यात महेश नरवाडे व अनिल लाजरस हे जावई- सासरे जागीच ठार झाले. महेश नरवाडे व त्यांची पत्नी हे जयराम हॉस्पिटल मध्ये काम करीत होते.

जावई महेश नरवाडे हे सासरे लाजरस यांना जेवणासाठी पळसे येथील घरी घेऊन गेले होते परत येत असताना झालेल्या अपघातात या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शहराच्या वर्दळी कर्करश आवाज करीत स्पोर्ट्स बाईक वेडीवाकडी वेगाने चालवित काही युवक दुचाकी चालवित असल्याने अनेकदा अपघात होत असतात. आज अपघातात जावई सासऱ्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.