छापरू समाजाची बैठक संपन्न…..नवीन समिती निवडण्याची मंजुरी….. हॉल बांधण्याच्या विषयाला वेग……
नाशिक श्री छापरू समाज ट्रस्ट ची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी माजी अध्यक्ष राम सामनानी, उपाध्यक्ष प्रीतम आमेसर, खजिनदार हरीश देवानी, बाबुशेठ कृष्णानी, राजन बच्चुमल, अशोक केस्वानी, बाबूशेठ तारवानी, मनोज सामनानी, जगदीश भोजवानी, मोहन मंगनानी, चंद्रकांत वेन्सियानी उपस्थित होते. जेलरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज सिंधी कॉलनी हॉल याठिकाणी रविवार २६ जानेवारी रोजी बैठक पार पडली. यावेळी सदस्यांनी उपस्थित प्रश्नांना खजिनदार हरीश देवानी यांनी आपल्या रोख ठोक शैलीने समाधानकारक उत्तर दिले.
खजिनदार यांनी सन २०२३-२४ चा वार्षिक ताळेबंद सभासदांना वाचून दाखवीत सर्वसंमतीने मंजूर करून घेतला. ३४ लाख रुपयांचा ठेवींचा तपशील त्यांनी सभासदांना सादर केले. भविष्यात छापरू समाजात होणाऱ्या विविध धार्मिक उपक्रम
खेळीमेळीने व्हाव्यात तसेच समाजात मयतीला अनुपस्थित राहणाऱ्या सभासदांना दंडाची तरतूद आदी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊन एकमत झाले. छापरू समाजाची मोटवानी रोड जवळ मोक्याच्या ठिकाणी असलेल्या प्लॉट वर सकारात्मक चर्चा होऊन लवकरच प्रशस्त हॉल बांधण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
सन २०१६ पासुन कार्यरत असलेल्या छापरू पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी भविष्यात युवा सदस्यांनी जबाबदारी घ्यावी म्हणून आपल्या पदांचा राजीनामा देऊन नव्या युवा पंचायत निर्मितीसाठी मार्ग मोकळा केला. जुनी समिती येत्या २५ फेब्रुवारी पर्यंत काळजीवाहू म्हणून पदाधिकारी राहणार असून २५ फेब्रुवारी नंतर नवी समिती अस्तित्वात येण्याची शक्यता असून त्यासाठी चंद्रकांत वेंसियानी, पंकज आलठक्कर, प्रकाश लखवानी, सुंदरदास रामचंदाणी, मनीष भोजनानी, पवन सुगंध, मनोज आमेसर, हरीराम देवानी, सुरेश मंगनानी, सुरेश कमवानी, मोहन आमेसार, आदी इच्छुकांनी पंचायत समितीवर समाजासाठी निःस्वार्थ पणे काम करण्याची तयारी दाखविली. येत्या २५ फेब्रुवारी पर्यंत जुन्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपणार असून नव्या समितीची सर्वसंमतीने लवकरच घोषणा करण्यात येणार आहे. यावेळी बैठकीत नरेश आमेसर, भगवान आमेसर, दीपक देवानी, भारत आमेसर, भूपेश सुगंध, गोपी आलठक्कर, शंकर देवानी, भगवान केस्वानी, नवीन वाघवणी, घनश्याम आमेसर, संदिप सुगंध, सुदेश आमेसर, चंदर देवानी, प्रदीप आमेसर, विशंदास रामचंदानी, किशन हेमनानी आदी समजबांधव उपस्थित होते.