प्रकाश ताजनपुरे यांच्या विरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात तक्रार…….. सिंधी बंधवांतर्फे निवेदन…….. भाविक आणि समाजाबद्दल अवमानकारक शब्द….. जाहिर माफी मागण्याची मागणी….,..अन्यथा आंदोलन…..
झुलेलाल मंदिराची बदनामी केल्या प्रकरणी प्रकाश ताजनपुरे यांच्यावर कारवाई होण्यासाठी सिंधी समाजातर्फे पोलिसांना निवेदन देण्यात आले.
मंदिर आणि सिंधी समाजाची बदनामी तसेच समाजात द्वेष निर्माण करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी श्री झुलेलाल चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे पोलिसांना निवेदन देण्यात आले. नाशिकरोड कलानगर भागात सिंधी बांधवांचे पूज्य झुलेलाल ध्यान मंदिर असून सिंधी समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील अशी अवमानकारक भाषा फेसबूक आणि एका दैनिकात बातमी ही प्रकाश ताजनपुरे यांनी दिली होती. फेसबुक कमेंट मध्ये नंगा नाच आदी शब्द आणि दैनिकात धिंगाणा, दंडुके घेऊन रस्त्यावर उतरू, अशी अवमानकारक आणि धमकीची भाषा भाविकांसाठी वापरण्यात आली आहे. सदर प्रकाराने सिंधी समाजात तीव्र नाराजी पसरली आहे. सिंधी समाजाने मंगळवारी पूज्य झुलेलाल ध्यान मंदिरात निषेध बैठक घेतल्यानंतर प्रकाश ताजनपुरे यांच्या विरोधात नाशिक रोड पोलिस तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बुधवारी सायंकाळी नाशिकरोड पोलिस ठाण्यात सिंधी बांधवांच्या शिष्टमंडळाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांना भेटून सविस्तर चर्चा केली. सिंधी बांधवांनी श्री झुलेलाल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने तक्रार अर्ज दिला. बदनामी होईल अशी अवमानकारक भाषा वापरणाऱ्या प्रकाश ताजनपुरे यांनी सिंधी समाजाची दैनिकात आणि सोशल मीडियावर जाहीर माफी मागावी आणि ताजनपुरे यांनी तसे न केल्यास त्यांचावर गुन्हा दखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. कठोर कारवाई न झाल्यास सिंधी समाजातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा श्री झुलेलाल चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे देण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरी यांनी जी काही कायदेशीर कारवाई असेल ती लवकरच करण्यात येईल असे आश्वासन सिंधी बांधवांना दिले. निवेदनावर श्री झुलेलाल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राम साधवानी यांच्यासह इतर समाजबांधवांच्या स्वाक्षरी आहेत.यावेळी सरचिटणीस किशोर कारडा, हरि देवानी, राजेश मसंद, दीपक तोलानी, चंद्रकांत वेन्सियानी, सुरेश सुंदरानी, प्रशांत रामनानी, अशोक केसवानी, दिनेश साधवानी, सुदर्शन चंदनानी, कन्हैयालाल माखिजा, लखमीचंद दोडेजा, गिरीश रामवानी, गिरीश नंदवानी, हरेश थावानी, गिरीश आहुजा यांच्यासह सिंधी बांधव उपस्थित होते.