सिन्नर फाटा भागात युवकाचा खून…. खूनाचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद..परिसरात भीतीचे वातावरण……. लोखंडी रॉडने बारा वार….
नाशिकरोड सिन्नर फाटा भागात जमिनीच्या वादातून शुक्रवारी 2 ऑगस्ट रोजी एकाचा खून करण्यात आला आहे. नासिक पूना महामार्गावर उजव्या बाजूला सर्व्हिस रोडवर सिन्नर फाटा लक्ष्मी दर्शन टॉवर क्रमांक १ मध्ये असलेल्या यश टायर नावाचे व्हील अलाईटमेंट चे दुकान असून दुकानाबाहेर बाहेर 4/30 वाजेच्या सुमारास जुन्या वादातून प्रमोद वाघ या व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. गंभीर जखमी प्रमोद वाघ याला उपचारार्थ नाशिकरोड येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र गंभीर जखमी असल्याने त्याला जयराम हॉस्पिटल मध्ये हलविण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान प्रमोद याचा मृत्यू झाला. यश टायर या दुकानाबाहेर प्रमोद वाघ आणि दोन जणांमध्ये वाद झाले आणि त्यातील एकाने दुकानाबाहेर असलेल्या ब्रेक लॉकचे लोखंडी रॉड उचलून प्रमोद वाघ यास लोखंडी रॉडने डोक्यावर बारा जोरदार वार केला. हल्ला झाल्यानंतर प्रमोद हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. प्रमोद यास पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात हलविले पण गंभीर जखमी प्रमोद वाघ याचा मृत्यू झाला.
हल्ला केल्यानंतर आरोपी दुचाकी वरून पळून गेला. जीवघेणा हल्ला झाल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपयुक्त मोनिका राऊत, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे, सहायक पोलिस निरीक्षक सुखदेव काळे, कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. हल्ल्याची संपूर्ण घटना शोरुम मध्ये असलेल्या सी सी टीव्ही मध्ये कैद झाला असून आरोपीने प्रमोद याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने बारा वार केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.