मालधक्का रोडवरील अवजड वाहनांची वाहतूक थांबवा अन्यथा आंदोलन…. पँथर्स रिपब्लीकन पार्टी तर्फे आर.टी.ओ अधिकाऱ्यांना निवेदन…..

नाशिकरोड मालधक्का या ठिकाणाहुन अवजड वाहनांची सर्रास वाहतुक चालते, ज्यात लोखंड, सिमेंट, रासायनिक खते, आदी वाहतुक केली जाते. नाशिकरोड रेल्वे मालधक्का या परिसरात दोन विद्यालये आहेत, त्या विद्यालयातुन विदयार्थ्यांची ये जा चालु असते त्याचबरोबर रेल्वे मालधक्का या परिसरात मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर, महात्मा फुले नगर, बौध्दनगर, राजवाडा आदी परिसर दाट लोकवस्तीचे आहेत. मागील वीस वर्षांपासुन या परिसरात अवजड वाहनांच्या अपघातामुळे अनेक विद्यार्थी, रहीवाशी, महिला आदी शेकडो लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. अनेकवेळा वेगवेगळ्या संघटनांनी आपणांस या संबंधीत सर्व कार्यालयांना निवेदने व पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु सदरहू निवेदनांना आज पर्यंत केराची टोपली दाखविण्यात आली आहे. हे जे अवजड वाहने लोखंड व सिमेंट खाते आदी वाहतुक करतात त्यांना RTO चे फिटनेस सर्टीफिकेट दिलेले आहे. परंतु हे अवजड वाहने क्षमते पेक्षा दुप्पट, तिप्पट मालाची वाहतुक करतात व हे पुर्णतः बेकायदेशीर आहे. यात त्यांना कुणी अधिकारी मदत करते का ? याचा देखील शोध घेणे गरजेचे आहे व क्षमते पेक्षा दुप्पट तिप्पट मालाची वाहतुक करणारे वाहने यांचा अपघात होणे स्वाभाविक आहे.
नाशिकरोड मालधक्का यावरील या अवजड वाहनांची वाहतुक त्वरीत थांबवुन होणारी जीवीत हानी ताबडतोब थांबवावी अन्यथा आमच्या पक्षाच्या वतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन करुन रस्ता रोको करण्यात येईल. यास आपण व संबधीत अधिकारी यांनी देखील नोंद घेऊन ही बेकायदेशीर अवजड वाहनांची वाहतुक थांबवुन येथील हजारो नागरीकांना न्याय मिळविण्यासाठी
पँथर्स रिपब्लीकन पार्टी गाडे गटाचे जिल्हाध्यक्ष सुशांत भालेराव, नाशिकरोड अध्यक्ष स्वप्निल चंद्रमोरे, पप्पू निकम, अतुल चंद्रमोरे, अभिष भालेराव, निलेश निकम, कासिम खान, आसिफ पटेल, सचिन धागरमाळे, जय निकम यांच्यातर्फे नाशिकच्या आर.टी.ओ. ऑफिसला निवेदन देण्यात आले.

