Homeअपघातउपनगर सिग्नल जवळ अपघातात इसम जखमी..... झाडे काढल्यानंतर खड्डे न बुजविल्याने अपघात........
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

उपनगर सिग्नल जवळ अपघातात इसम जखमी….. झाडे काढल्यानंतर खड्डे न बुजविल्याने अपघात….. सुदैवाने वाचले

उपनगर सिग्नल जवळ अपघातात इसम जखमी….. झाडे काढल्यानंतर खड्डे न बुजविल्याने अपघात….. सुदैवाने वाचले……

नाशिक पूना रोडवर वाहतुकीस अडचणीचे आणि अपघाताला आमंत्रण ठरणारे रस्त्यावरील २४ झाडे शासनाने हटविण्याचे ठरविले त्याप्रमाणे उपनगर सिग्नल आणि दर्गा जवळील झाडे प्रशासनाने काढले. नाशिक पुना रोडवरील वाहतूक सुरळीत होईल म्हणून झाडे काढण्यात आली परंतु झाडे काढल्यानंतर काही ठिकाणी खड्डे आहे तसेच ठेवले आहेत तर काही ठिकाणी खड्डे अर्धवट भुजवून बारीक खडी टाकण्यात आली असल्यामुळे वाहन धारक घसरून अपघात होत आहेत.

रविवारी रात्री ९ वजेच्या सुमारास राज राजेश्वरी याठिकाणी राहणारे अविनाश पांडे वय ४० हे  आपली MH 15 4463 या दुचाकीवरून घरी जात असताना उपनगर सिग्नल जवळ प्रशासनाने काढलेल्या झाडमुळे झालेला खड्डा योग्य प्रकारे भुजविण्यात न आल्यामुळे त्याठिकाणी घसरून पडला. अविनाश पांडे यांच्या डोक्याला मोठा मार लागले असून प्राथमिक उपचारासाठी त्यांना नाशिकरोड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

नाशिक पूना रोडवर काही ठिकाणी गरज नसताना रस्त्यांचे डांबरीकरण सुरू असून आणि झाडे काढल्यामुळे झालेले खड्डे बुजवून रस्ते बनवावे याकडे संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराचे लक्ष नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. अविनाश यांना हा अपघात जीवावर बेतले नाही पण अजून कुणा वाहनधारक चे अशा प्रकारे अपघात होऊन मृत्यू होऊ शकतो. शासनाने त्वरित झाडे काढल्यामुळे असलेले खड्डे बुजवून डांबरीकरण करावे अशी मागणी नागरिक करीत आहेत. अपघाताची माहिती मिळताच उपनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments