फसवणूक प्रकरणी अशोक कटारिया अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात जाणार….. फिर्यादी मनोज हरियानी यांची ९९ लाख रुपयांची फसवणूक….
गृह प्रकल्पात गुंतवणुकीवर १२ टक्के दराने परतावा देण्याचे आमिष दाखवून ९९ लाख ८९ हजार ४५० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संशयित अशोक मोतीलाल कटारिया जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला असून जामीन मिळण्यासाठी कटारिया उच्च न्यायालयात जाणार असल्याचे समजते. कटारिया यांच्या जामीन अर्जावर सोमवारी २९ एप्रिल रोजी
जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होऊन न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला.
नाशिकरोड येथील ‘डेस्टिनेशन वन’ नावाच्या प्रकल्पामध्ये दोन गाळे बुकिंग करून फिर्यादी मनोज हरियानी यांच्याकडून ५८ लाख रुपये घेऊन जादा परतावा देण्याची हमी दिली होती. यात हरियानी यांची ९९ लाख ८९ हजार ४५० रुपयांची फसवणूक झाल्याने याप्रकरणी नरेश कारडा यांच्यासह अशोक कटारिया, सतीश पारख, अनुप कटारिया व संबंधित कंपनीच्या अन्य संचालकांविरुद्ध महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण अधिनियमांतर्गत (एमपीआयडी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.