Homeक्राईमगायींची कत्तल करण्यासाठी वाहतूक करणारा इसम जेरबंद युनिट १ ची कारवाई
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

गायींची कत्तल करण्यासाठी वाहतूक करणारा इसम जेरबंद युनिट १ ची कारवाई

गायींची कत्तल करण्यासाठी वाहतूक करणारा इसम जेरबंद युनिट १ ची कारवाई…..

जिवंत गोवंश गायींची कत्तल करण्यासाठी वाहतुक करणारा संशयिताला गुन्हेशाखा युनिट क. १ ने जेरबंद केले आहे. २० मार्च रोजी युनिट क. १ चे पोलीस हवालदार रमेश कोळी यांना बिरबल आखाडा बागवानपुरा येथे जिवंत गोवंश जातीचे जनावरे कत्तल करण्यासाठी गाडीमध्ये येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक गजानन इंगळे, रमेश कोळी, देविदास ठाकरे, योगीराज गायकवाड, जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी, समाधान पवार व त्यांच्या पथकासह भद्रकाली पोलीस ठाणे कडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे, सोनवणे आदींनी बीरबल आखाडा याठिकाणी सापळा लावुन संशयीत टाटा कंपणीचा छोटा हत्ती क्रमांक एम.एच. १५ सी. के ९५६२ या मधील संशयित सद्दाम अन्वर पाटकरी, वय ३३वर्षे, रा-घर नं २६०५ जोगवाडा, मुलतानपुरा, भद्रकाली यास ताब्यात घेतले.

त्यावेळी त्याचे ताब्यातील छोटा हत्तीमध्ये एक तपकीरी रंगाची गाय व एक काळया व पांढ-या रंगाची गाय बेकायदेशीर पणे कत्तल करण्याचे उददेशाने घेवुन जात असतांना मिळून आल्याने पंचनामा करून वाहनासह एकुण ३,२५,०००/-रूपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेवुन संशयित इसमाविरूध्द महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम स.न. १९७६ चे कलम ५ व ९ तसेच भारताचा प्राण्यास निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११ प्रमाणे भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी पोलीस आयुक्त संदीप कर्णीक, पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहायक पोलीस आयुक्त सिताराम कोल्हे, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलिस उप निरीक्षक गजानन इंगळे, रमेश कोळी, देविदास ठाकरे, योगीराज गायकवाड, जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी, राजेश राठोड, समाधान पवार तसेच भद्रकाली पोलीस ठाणे कडील सहायक पोलिस उप निरीक्षक गांगुर्डे व सोनवणे आदींनी संयुक्तपणे केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments