चाडेगावला चोरट्यानी थेट एटीएम मशीन चोरले:-सीसीटीव्ही मध्ये घटना कैद
सामनगाव रोड परिसरात आरपीएफ सेंटर असून या सेंटर जवळच एसबीआय बँकेचे एटीएम आहे या ठिकाणी मध्यरात्री चार वाजेच्या सुमारास चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला मात्र तो यशस्वी होत नसल्याने अखेर चोरट्याने एटीएम च उचलून चोरून नेले.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यावर शुकशुकाट असतो परिणामी या संधीचा फायदा घेऊन सामनगाव रोड परिसरात असलेल्या आरपीएफ सेंटर जवळील एटीएमच चोरट्यांनी चोरून नेले सदरची घटना सकाळी नागरिकांना समाजात त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली त्यानंतर तातडीने नाशिक रोड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा त्यामध्ये एक पिकप व स्विफ्ट डिझायर गाडी या परिसरातून जाताना दिसली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे दरम्यान या एटीएम मध्ये किती रक्कम होती याबाबत निश्चित आकडा समजू शकला नाही पोलिसांनी सी सी टीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असून पुढील तपास नाशिक रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.