गोवंश मास विक्री संशयित ताब्यात…… ६ आरोपीसह ३८० किलो गोवंश मास जप्त……
भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत, गोवंश मांस विक्री करताना ६ संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ७६००० रू किमतीचा ३८० किलो गोवंश मास व एक रिक्षा ताब्यात घेऊन एकूण १ लाख ३६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल गुन्हे शाखा युनिट -२ व भद्रकाली पोलीस ठाणे यांच्या संयुक्त कामगिरीत हस्तगत करण्यात आले आहे.
०९ फेब्रुवारी रोजी गुन्हे शाखेचे विशाल कूवर, समाधान वाजे यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की आडगाव पोलीस ठाणे हद्दीत बागवानपुरा येथे एका रिक्षामध्ये गोवंश मास विक्री करता येणार असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक संदेश पाडवी, पोहवा मनोहर शिंदे, चंद्रकांत गवळी पो अंमलदार तेजस मते, विशाल कुवर, समाधान वाजे, महेश खांडबहाले व भद्रकाली पोलीस ठाण्यातील सहायक पोलिस उप निरीक्षक यशवंत गांगुर्डे, सतीश साळुंखे, दयानंद सोनवणे, निलेश विखे यांनी सदर ठिकाणी सापळा रचून ६ संशयितांना ताब्यात घेऊन नमूद गोवंश मास व एक रिक्षा ताब्यात घेऊन पुढील कारवाई साठी भद्रकाली पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आले आहे. अधिक तपास गुन्हे शाखा युनिट २ चे पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.