क्राईम ताज्या बातम्या

देवळाली गावात तरुणावर जीवघेणा हल्ला……..जखमी तरुणाला रुग्णालयात केले दाखल

देवळाली गावात तरुणावर जीवघेणा हल्ला……..जखमी तरुणाला रुग्णालयात केले दाखल

 


नाशिकरोड देवळाली गावातील महात्मा गांधी पुतळा मागे असलेल्या एका सलून मध्ये युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला असून हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. देवळाली गावात महात्मा गांधी पुतळा मागे असलेल्या किस्मत हेअर सलून येथे अमन शेख हा तरुण हा कटिंग साठी बसला असता संशयित शिब्बान शेख, अजीम शेख, बाबी या तिघांनी जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी करून फरार झाले.

जुन्या भांडणाच्या कारणावरून जीवघेणा हल्ला झाल्याचे समजते. गंभीर जखमी अमन शेख या युवकाला नजीकच्या बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.


हल्ल्याचा संपूर्ण प्रकार सी सी टीव्ही मध्ये कैद झाला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत. युवकावर झालेल्या जीवघेणा हल्ल्याने परिसरात भीतीयुक्त वातावरण पसरले असून वारंवार होणाऱ्या गुन्हेगारी घटनांना पोलिसांनी आला घालावा आणि आरोपींना त्वरित अटक करावी अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *