792 Views
कचरा डेपोमुळे होणारे प्रदुषण योग्य वेळीच रोखणे गरजेचे….गावाच्या विकासासाठी गावांच्या समस्या सोडविण्यासाठी तरुण वर्ग आला एकत्र…..
हनुमान मंदिर सस्तेवाडी येथे पार पडलेल्या मीटिंग मध्ये खूप साऱ्या तरुण वर्ग व ग्रामस्थांचा गावांच्या विकासासाठी जबाबदार नागरिक म्हणून सहभाग नाविन्याजोगा होता. त्यामध्ये कचरा निवर्णासंदर्भात बरोबर अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. फलटण नगरपालिका कचरा डेपो व्यतिरिक्त मोकळ्या जागेत टाकला जाणारा पूर्ण कचरा बंद करण्यात यावा तसेच सोमवार पेठ ते बाणगंगा नदी पर्यंत स्ट्रीट लाईट बसविणे जेणेकरून रात्री प्रवास करताना वाहनचालकांना वाहन चालवताना कसलाही अडथळा निर्माण होणार नाही यांची खबरदारी घेणे आवश्यक असुन कचरा डेपोवर २४ तास सुरक्षा गार्ड ची नेमणूक करावी जेणेकरून आसपासच्या परिसरातील ग्रामपंचायत किंवा अनोळखी व्यक्ती मृत जनावरे, याबरोबरच कचरा डेपोच्या चारही बाजूंनी CCTV कॅमेरे बसविण्यात आला तर कचरा कोणीही पेटवणार नाही आणि होणारे प्रदुषण आपल्याला थांबवता येईल. कचरा डेपो शेजारीच संपूर्ण फलटण शहराला पाणीपुरवठा करणारा तलाव असल्यामुळे पाणी दुषित होते हे प्रदुषण योग्यवेळिच रोखता यावे यासाठी कचरा डेपोच्या चारही बाजुला झाडे लावून त्याझाडांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. कचरा डेपो रस्त्याच्या कडेला असणाऱ्या चाऱ्या नदीपर्यंत खोदून त्या वेळोवेळी साफ ठेवण्यात यावी अशी मागणी सस्तेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आली असून गावाची समस्या सोडविण्यासाठी आणि गावाचा विकास करण्यासाठी एकत्र येण्याचा संकल्प यावेळी केला गेला. या सगळ्या मुद्द्यांवर लक्ष दिले गेले नाही तर आंदोलन सुध्दा उभे करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
सदर बैठक गावातील हनुमान मंदिरात पार पडली या बैठकीला ग्रामस्थ आणि तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.