बुद्ध विहार समन्वय समिती तर्फे पालि भाषा प्रवेश प्रवेश परीक्षांचे आयोजन
बुद्ध विहार समन्वय समितीने रविवार ११ डिसेंबर २०२२ रोजी अखिल भारतीय पालि भाषा प्रवेश परीक्षा (क्रमांक एक, दोन, तीन, चार) आयोजित केली. नाशिक येथे दुपारी बारा ते एक या दरम्यान ०९ परीक्षा केंद्रांच्या माध्यमातून जवळपास २७५ परीक्षार्थी या परीक्षेस बसले होते. केंद्र संचालकांस प्रश्नपत्रिका सील पॅक करून हँड ओव्हर करण्यात आल्या होत्या. सर्व केंद्र संचालकांनी परीक्षार्थीसमोर हे सिल्ड पॅकेट्स उघडतानाचे व्हिडिओ शूटिंग केले. परिक्षा सुरू करण्यापूर्वी सामुहिक तिसरण/पंचशील वंदना घेण्यात आली.
गौतमी बुद्ध विहार, उपेंद्र नगर सिडको-अंबड लिंक रोड या ठिकाणी वंदनीय भिक्खूसंघाच्या मार्गदर्शनानुसार केंद्र संचालक/परीक्षकांनी परीक्षेचे कामकाज बघितले. नाशिक जिल्हा
मुख्य परीक्षा नियंत्रक आचार्य नंदकिशोर साळवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा समिती सदस्य, केंद्र संचालक, केंद्र सहाय्यक, पर्यवेक्षक, स्थानिक बुद्ध विहारांच्या व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी/प्रतिनिधी आदींनी परीक्षेचे कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. तसेच अविनाश गायकवाड, अशोक जगताप, कल्पना जगताप, वेणुताई गायकवाड, रूणाली जाधव, किरण जाधव, प्रकाश दोंदे, भरतभाऊ तेजाळे, शैलाताई उघाडे, महेंद्र भालेराव, काजल आढाव, अश्विनी केदारे, नानासाहेब केदारे, सुभाष केदारे, रंजन आहिरे, उद्धव आहिरे, विशाखा मोरे, पंजाबराव कांबळे, कॅप्टन कुणाल गायकवाड, ॲड. प्रदीप गोसावी, पूजा गोसावी आदींनी उल्लेखनीय सहकार्य केले.
अशी माहिती संस्थापक सदस्य तथा राष्ट्रीय महासचिव, बुद्ध विहार समन्वय समितीचे प्रा. उमेश पठारे