खंडणी आरोपात कैलास मैंद पोलिसांच्या ताब्यात…… उपनगर पोलिसांची कामगिरी……
नाशिक शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरूच असून संशयित कैलास मैंद यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. कैलास मैंद यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
महिला आणि अन्य कर्जदारांकडून सातत्याने खंडणीची मागणी करत असल्याचा आरोप मैंद यांच्यावर असून उपनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होता. हेमंत कृष्णा कापसे, यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कैलास मैंद, संतोष कुशारे फरान सैय्यद यांच्याविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कापसे यांनी कैलास मैंद यांच्याकडून त्यांचे हरिविहार सोसायटी शेलार मळा, शिवाजी नगर जेलरोड नाशिक येथील कार्यालयात जावुन व्याजाने घेतलेल्या पैशांच्या बदल्यात यांच्याकडुन 2 लाख 75 हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती.
कापसे यांनी त्याला सदर पैसे न दिल्यास त्याने फिर्यादी यांच्या परिवारास व फिर्यादी यांना संपवुन टाकण्याची धमकी देवुन फिर्यादी यांचेकडुन सप्टेंबर 2022 मध्ये 50,000/- रू. बळजबरीने घेतले. तसेच इतर आरोपी कापसे यांना फोन करून परिवारास संपवुन टाकण्याची धमकी देवुन फिर्यादी कडे 2,75,000 /- रुपयांची खंडणी मागीतली म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.
संशयित मैंद यांना एक दिवसीय पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून अटक केल्यानंतर मैंद कडून देखील नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असा उच्चार करण्यात आला. कैलास मैंद आणि सुरेश कुशारे यांच्यावर यापूर्वी पोलिस ठाण्यात इतर गुन्हा दाखल आहेत. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

