नाशिकपुणे महामार्गावर गतिरोधक बसवा…….गणेश कदम यांचे निवेदन…… शेवाळे यांच्याकडून सात दिवसात कामाचे आश्वासन…..
नाशिक-पुणे महामार्गावर गतिरोधक बसवा अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलनाचा इशारा शिवसेना सहसंपर्कप्रमुख गणेश कदम, सुप्रिया कदम यांनी इशारा दिल्यानंतर सात दिवसात काम करून देण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता संजय शेवाळे यांनी दिले आहे.
नाशिक-पुणे महामार्गावरील झेवियर हायस्कूल, घंटी म्हसोबा मंदिर आणि शिखरेवाडी येथील पासपोर्ट कार्यालयाजवळील गतिरोधक पूर्णतः निकामी झाल्याने गेल्या काही दिवसांपासून अपघातांची मालिका सुरू असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.

या ठिकाणी तात्काळ नवे गतिरोधक बसवावेत अशी मागणी नागरिकांनी सहसंपर्कप्रमुख गणेश कदम आणि स्व. राजाभाऊ कदम सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्ष सौ. सुप्रिया गणेश कदम यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत नाशिक येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयात कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता आणि उपविभागीय अभियंता यांची भेट घेऊन गणेश कदम यांनी निवेदन दिले होते.
नाशिक पुणे महामार्ग पडलेले खड्डे तात्काळ बुजवण्यात यावेत तसेच गतीरोधक टाकताना नागरिकांच्या आरोग्याची ही काळजी घ्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली. या वेळी कार्यकारी अभियंता संजय शेवाळे यांनी ७ दिवसांत त्या ठिकाणी नवीन गतिरोधक बसविण्याचे काम पूर्ण केले जाईल असे आश्वासन दिले.
कार्यकारी अभियंता दिलेले आश्वासन नुसार
“जर ठरलेल्या मुदतीत गतिरोधकाचे काम पूर्ण झाले नाही तर शिवसेना पक्ष नागरिकांना घेऊन सेना स्टाईलने मोठे आंदोलन उभारेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग विभागाची असेल असा स्पष्ट इशारा शिवसेना सहसंपर्क गणेश कदम व सुप्रिया कदम यांनी दिला.
या भेटीप्रसंगी कार्यकारी उपअभियंता प्रसाद दळवी, निकेश पाटील, संजय बर्वे तसेच शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

