गळ्यातील ओमपान चोरणारे आरोपी ताब्यात….. गुन्हे शाखा युनिट १ ची कामगिरी…..
दारू पिण्यासाठी परप्रांतीयास मारहाण करून त्याचे गळयातील ओमपान जबरदस्तीने चोरून पळून जाणारे सराईत आरोपीला जेरबंद गुन्हेशाखा युनिट क. १ ने जेरबंद केले आहे. २९ जुलै रोजी दुपारी ०१:२० वाजेच्या सुमारास एन. डी. पटेल रोडवरील पोस्ट ऑफीस समोर येथे ४ अनोळखी इसमांनी फिर्यादीला कारण नसतांना मारहाण करून त्यांच्या गळयातील सोन्याचे ओमपान बळजबरीने काढुन घेवुन पळून गेले होते. फिर्यादी कुवर नैय्यालाल चौहान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सदर ४ अनोळखी इरामाविरूध्द भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हे शाखा, युनिट कमांक १ हे सदर गुन्हयातील पाहिजे आरोपीतांचा शोथ घेत असतांना गुन्हेशाखा युनिट क्रमांक १ चे उत्तम पवार व गोरक्ष साबळे यांना
सदर गुन्हयातील आरोपी हे बी. डी. भालेकर मैदान, नाशिक येथे येणार असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली होती. पथकाने बी.डी. भालेकर मैदान येथे सापळा रचुन संशयित भोलानाथ सिताराम साळवे, वय-२५वर्षे, रा-श्रमिकनगर, गंजमाळ नाशिक, परवेज मुस्ताक पठाण, वय-३३वर्षे, रा-घर नं १४५, श्रमिकनगर, गंजमाळ नाशिक यांना ताब्यात घेतले.
अधिक तपास केला असता त्यांनी व त्यांच्या आणखी दोन साथीदारांनी संगणमत करून सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने भोलाराम साळवे यांच्या ताब्यातुन ६,०००/-रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास भद्रकाली पोलीस ठाणे करीत आहे. आरोपी भोलाराम साळवे हा भद्रकाली पोलीस ठाणे दाखल विविध गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार असुन त्यास यापुर्वी तडीपार करण्यात आले होते.
सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त संदिप मिटके यांच्यामार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलिस उप निरीक्षक चेतन श्रीवंत, उत्तम पवार, योगीराज गायकवाड, महेश साळुंके, देविदास ठाकरे, कैलास चव्हाण, रमेश कोळी, गोरक्ष साबळे, राम बर्डे, आप्पा पानवळ, राहुल पालखेडे, जगेश्वर बोरसे, समाधान पवार आदींनी केली आहे.