नाशिकरोड आठवडे बाजारात अतिक्रम कारवाई…..
नाशिकरोड भागात अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढेल असून नागरिकांना आणि वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. देवळाली गाव आठवडे बाजार गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांसाठी महत्त्वाचे ठिकाण आहे.
आठवडे बाजारात येणाऱ्या शेतकरी आणि इतर व्यापाऱ्यांचा व्याप मोठ्या प्रमाणात वाढल्याने बाजार थेट देवळाली गाव महात्मा गांधी पुतळा परिसर, अनुराधा थिएटर रोड आणि मागील संपूर्ण परिसरात बाजार भरू लागल्याने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते आणि त्यातून नागरिकांना आणि वाहनधारकांना येण्याजण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती.
अतिक्रमण बाबत अनेक तक्रारी आणि बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर मनपा अतिक्रमण विभाग जागे झाले आणि अतिक्रमण उपआयुक्त दाखणे मॅडम यांचा आदेश मिळाल्याने नाशिकरोड विभागीय अधिकारी त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली आठवडे बाजार देवळाली येथे मोठी कारवाई करण्यात आली.
यावेळी अतिक्रमण हटविल्यानंतर परिसर मोकळे झाले होते. अमित पवार, निखिल तेजाळे, उमेश खैरे, प्रभाकर अभंग यांच्यासह कर्मचाऱ्यांनी मोहीम पार पाडली.