बिटको महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न…..
आयुष्यात शिक्षण सर्वात महत्त्वाचे , त्याशिवाय प्रगती नाही . वाचन, चिंतन स्वअध्याय करा. आपला काही वेळ आपल्या नात्यांसाठी ठेवा.स्वप्न साकारण्यासाठी कठोर परिश्रम आवश्यकता आहे. मी देखील नाशिकरोड महाविद्यालयाचा विद्यार्थी असून विविध कौशल्य आत्मसात करा. शिक्षणासाठी संघर्ष करायला शिका. प्रत्येक गोष्ट चटकन मिळाल्यास त्याची किंमत समजत नाही आयुष्यात योग्य वेळी योग्य गोष्ट करा, आई वडील व शिक्षकांचा आदर करा , ” असे प्रमुख अतिथी प्रसिद्ध अस्थीरोगतज्ञ व व्यापारी बँक संचालक डॉ. प्रशांत भुतडा यांनी केले.
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात दि.१३ एप्रिल रोजी ‘ ६२ वा ‘ वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ ‘ उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. राम कुलकर्णी यांच्यासह सन्माननीय अतिथी डॉ.प्रशांत भुतडा, विशेष अतिथी नाशिकरोड शाखा सचिव डॉ.व्ही. एन. सूर्यवंशी , नाशिकरोड सहाय्यक शाखा सचिव डॉ. प्रणव रत्नपारखी, महाविद्यालयाचे नवनियुक्त प्रभारी प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे , वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. आकाश ठाकूर , विज्ञान विभागाचे उपप्रचार्य डॉ. के. सी. टकले, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ. सुनिता नेमाडे , विद्यार्थी सभा कार्याध्यक्ष लक्ष्मण शेंडगे, सुहास माळवे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. दीपक टोपे , कुलसचिव राजेश लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते .
कार्यक्रमाचा प्रारंभ स्वागत व सोसायटी गीताने झाला . त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे यांनी मान्यवरांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले व वार्षिक आढावा उपस्थितांसमोर सादर करून गोएसोच्या सचिव डॉ.सौ दिप्ती देशपांडे यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नाशिकरोड महाविद्यालयाची वाटचाल वाटचाल उत्कृष्टपणे सुरु असल्याचे सांगितले. त्यानंतर प्रमुख अतिथी व पदाधिकारी यांच्या शुभहस्ते इ.११वी,१२ वी,पदवी, पदव्युत्तर मधील प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण तसेच विविध स्पर्धा , वार्षिक स्नेहसंमेलन स्पर्धा , पोस्टर व मॉडेल मेकिंग, काव्य करंडक स्पर्धा.,एन.एस.एस.,एनसीसी व एअरविंग मधील दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच विविध पुरस्कार, पेटंट मिळवलेल्या व पीएचडी प्राप्त प्राध्यापक यांचा सत्कार करण्यात आला . तसेच स्व. पी. बी. कुलकर्णी पुरस्कार,यशवंत रारावीकर पुरस्कार , प्राचार्य ह. मा. रायरीकर , आदर्श प्राध्यापक , शिक्षक व कर्मचारी तसेच उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यात डॉ. कांचन सनानसे , डॉ.सुधाकर बोरसे, भूषण कोतकर , संदीप आरोटे, डॉ.सतीश चव्हाण ,प्रा जोती पेखळे, व्ही. आर ठोमरे, सौ. जयश्री देवरे तसेच उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी आरिफ पठाण , आदित्य गायकवाड , रवि गिते, दत्ता गोसावी, सुनीता शेंद्रे तर उत्कृष्ट विद्यार्थी इरफान नाई यांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना गोखले एज्युकेशन सोसायटीचे नाशिक विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी यांनी नाशिकरोड संस्थेने विविध उपक्रम व निकालाची परंपरा कायम जपली आहे.अनेक नामवंत विद्यार्थी घडवले आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व कौशल्यास वाव देण्याचे काम सातत्याने करीत आहे . आपले शिक्षण दर्जेदार व काळानुरुप असावे , ज्ञानाची कास धरा.आपल्याला जे काही मिळाले आहे ते प्रत्येक काम उत्कृष्ट व्हावे तसा ध्यास घेऊन कार्याला झळाळी द्या सुजाण ,सुज्ञ नागरिक बनून समाजासाठी चांगले काम उपयुक्त काम करत वाटचाल करा असे सांगितले .
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयाच्या ‘ उन्मेष ‘ या वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच डॉ. विलास कांबळे यांच्या मानसशास्त्र विषय संदर्भ ग्रंथाचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले. विशेष अतिथी डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी यांनीही उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास एनएसएस कार्यक्रम अधिकारी संतोष पगार , स्टाफ सेक्रेटरी डॉ. विजय सुकटे , राहुल पाटील, नरेश पाटील, डॉ कांचन सनानसे, डॉ विद्युल्लता हांडे, अनुराग रत्नपारखी, श्यायोंती तलवार, वसीम बेग, डॉ मनेष पवार, डॉ. गणेश दिलवाले,संजय परमसागर, आर. बी. बागुल, डॉ. शरद नागरे यासह सर्व विभागप्रमुख , वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सत्कारार्थी विद्यार्थी व पालक आदी उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सुधाकर बोरसे यांनी केले तर आभार डॉ. लक्ष्मण शेंडगे यांनी मानले . कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.