पूज्य झुलेलाल जयंती महोत्सव…..
नाशिक सिंधी पंचायत तर्फे विविध कार्यक्रम….
नाशिक सिंधी पंचायत तर्फे भगवान पूज्य झुलेलाल अवतरण दिवस पूज्य झुलेलाल जयंती उत्सव मोठ्या साजरा करण्यात येणार आहे.
सिंधी बांधवांचे कुळदैवत भगवान पूज्य झुलेलाल यांचा रविवार 30 मार्च रोजी साजरा होणाऱ्या जयंती उत्सव निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जयंत निमित्ताने रामी भवन येथे नुकतीच नाशिक सिंधी पंचायतीची बैठक पार पडली. बैठकीत सर्वसंमतीने कार्यक्रमांना मंजुरी देण्यात आली.
दुपारी 2 वाजता झूलेलाल मंदिर, रामीबाई भवन येथे बहिराणा साहिब पूजा संपन्न झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन आहे. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता रामी भवन पासून ठक्कर डोम पर्यंत पारिवारिक बाईक, कार रॅली निघणार असून यामध्ये सिंधी समाजातील सर्व परिवाराने सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. रॅली संपन्न झाल्यानंतर नाशिक ठक्कर डोम याठिकाणी सायंकाळी पूज्य झुलेलाल आणि संत कंवरराम यांचे भव्य स्वागत होणार आहे. स्वागत समारंभ नंतर रात्री 10 वाजेपर्यंत भव्य सिंधी संगीत गीतांचा कार्यक्रमाने सिंधी समाज पूज्य झुलेलाल जयंती उत्सव भव्य दिव्य स्वरूपात साजरी करणार आहेत.
सायंकाळी कार्यक्रमात भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाउत्सवात सामील होण्यासाठी सिंधी समाज बांधवांनी 8007884005 या क्रमांकावर आपल्या परिवारातील सदस्यांची नोंदणी करावी.
भाविकांनी मोठ्या संख्येने पूज्य झुलेलाल अवतरण दिवस साजरा करण्यासाठी नोंदणी करून सामील व्हावे असे आवाहन नाशिक सिंधी पंचायतीतर्फे करण्यात आले आहे.